ETV Bharat / state

Highest Average Salary In India : देशात सोलापुरात मिळतो सर्वाधिक पगार? मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांना टाकले मागे

सरासरी वेतन सर्वेक्षणानुसार, देशात सोलापूर शहरात सर्वाधिक पगार मिळतो. मात्र या सर्वेक्षणात सोलापूर शहरातील केवळ 2 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे या आकडेवारीच्या अचूकतेवर शंका उपस्थित होत आहे.

Highest Average Salary In India
सर्वाधिक सरासरी पगार असलेले शहर
author img

By

Published : Jul 10, 2023, 10:59 PM IST

सोलापूर : भारतातील महानगरांमध्ये सर्वात जास्त पगाराची पॅकेजेस असतात, असा सर्वत्र समज आहे. मात्र सोलापूर शहराने या बाबतीत दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या टायर 1 शहरांना मागे टाकले आहे. जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या सरासरी वेतन सर्वेक्षण 2023 नुसार, सोलापूर शहरात देशातील सर्वाधिक सरासरी वार्षिक वेतन पॅकेज आहे.

सोलापूरचा देशात पहिला नंबर : सरासरी वेतन सर्वेक्षणानुसार, सोलापुरात वार्षिक सरासरी पगार दरवर्षी 28,10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसऱ्या स्थानी मुंबई आहे, जिचे वार्षिक वेतन सरासरी 21.17 लाख रुपये आहे. बेंगळुरू 21.01 लाख रुपये पगारासह 3 व्या क्रमांकावर आहे. राज्याचा विचार केल्यास, उत्तर प्रदेशने सर्वाधिक सरासरी वार्षिक पगारासह आघाडी घेतली आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो.

पुरुष आणि महिलांच्या पगारात लक्षणीय तफावत : जुलै 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणात असेही म्हटले आहे की, भारतातील सामान्य वार्षिक पगार 5 लाख रुपयांपेक्षा थोडा जास्त आहे. तर संपूर्ण देशाचा सरासरी वार्षिक पगार सुमारे 18.91 लाख रुपये आहे. पुरुष आणि महिलांच्या पगारातही लक्षणीय तफावत आहे. पुरुषांना सरासरी १९,५३,०५५, रुपये तर महिलांना सरासरी १५,१६,२९६ रुपये पगार मिळतो.

सर्वात जास्त पगार देणारे व्यवसाय : भारतातील सर्वात जास्त पगार देणारा व्यवसाय व्यवस्थापन आणि व्यवसाय उद्योगांमध्ये आहे. जेथे सरासरी वार्षिक वेतन 29.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसरा सर्वात जास्त पगार देणारा व्यवसाय म्हणजे कायदा, जिथे वार्षिक सरासरी पगार सुमारे 27 लाख रुपये आहे.

सोलापूर शहरातील केवळ 2 जणांचे सर्वेक्षण : इथे एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे 11570 लोकांच्या सर्वेमध्ये सोलापूर शहरातील केवळ 2 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मुंबईत 1748 जणांचे आणि भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळख असणाऱ्या बेंगळुरूच्या सर्वेक्षणात 2799 जणांचा सहभाग होता. तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 1890 लोकांचा सहभाग होता.

देशातील शहरांमध्ये सरासरी पगार :

  1. सोलापूर - २८,१०,०९२ रुपये
  2. मुंबई - २१,१७,८७० रुपये
  3. बंगळुरू - २१,०१,३८८ रुपये
  4. दिल्ली - २०,४३,७०३ रुपये
  5. भुवनेश्वर - १९,९४,२५९ रुपये
  6. जोधपूर - १९,४४,८१४ रुपये
  7. पुणे- १८,९५,३७० रुपये
  8. हैद्राबाद - १८,६२,४०७ रुपये

हेही वाचा :

  1. Nirmala Sitharaman on GST: जीएसटीमुळे महागाई कमी झाली- निर्मला सीतारामन यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.