ETV Bharat / state

शेतकऱ्यांचा जन्म होतो कर्जात, वाढ होते सरळ व्याजात; मृत्यू होतो चक्रीवाढ व्याजात - private money lenders in solapur

सोलापूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची जमिनी या खासगी सावकारांच्या चक्रीवाढ व्याजात अडकल्या आहेत. जिल्ह्यातील खाजगी सावकार ऐनवेळी शेतकऱ्यांना मदत तर करतात. पण त्या मोबदल्यात त्यांच्या जमिनीच्या उताऱ्यावर देखील नावे चढवतात. खाजगी सावकारांना अशा प्रकारे जमिनी हडप करण्याचा अधिकार कोणी दिला आहे, याचे कोडे आजतागायत सुटले नाही.

solapur districts many farmers take a Loan on private money lenders
शेतकऱ्यांचा जन्म होतो कर्जात, वाढ होते सरळ व्याजात; मृत्यू होतो चक्रीवाढ व्याजात
author img

By

Published : Mar 30, 2021, 3:05 AM IST

Updated : Mar 31, 2021, 5:47 AM IST

सोलापूर - जिल्ह्यात सावकारी जाचास कंटाळून पहिली आत्महत्या ही वाळूज देगाव येथे एका शेतकऱ्याने केली होती. ही घटना होऊन आज अनेक वर्षे उलटली. मात्र सावकारी फास आजदेखील शेतकऱ्यांच्या गळ्यात अडकलेला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात इब्राहिम मुलाणी (वय 30 रा. पंढरपूर, जि. सोलापूर) या शेतकऱ्याने सावकारी जाचास कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील थेट टॉवरवर चढून दोन तास प्रशासनाला धाऱ्यावर धरले होते. जिल्हा उपनिबंधक अधिकारी कुंदन भोळे यांनी आश्वासन दिल्यानंतर इब्राहिम मुलाणी याने टॉवरवरून खाली उतरून व्यथा मांडली आणि हे कारस्थान त्याने सावकारी जाचास कंटाळून केले असल्याची माहिती दिली.

शेतकऱ्यांचा जन्म होतो कर्जात, वाढ होते सरळ व्याजात; मृत्यू होतो चक्रीवाढ व्याजात
लाखो शेतकरी हे सावकारांच्या चक्रीवाढ व्याजात अडकले-
सोलापूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची जमिनी या खासगी सावकारांच्या चक्रीवाढ व्याजात अडकल्या आहेत. जिल्ह्यातील खाजगी सावकार ऐनवेळी शेतकऱ्यांना मदत तर करतात. पण त्या मोबदल्यात त्यांच्या जमिनीच्या उताऱ्यावर देखील नावे चढवतात. खाजगी सावकारांना अशा प्रकारे जमिनी हडप करण्याचा अधिकार कोणी दिला आहे, याचे कोडे आजतागायत सुटले नाही. भारत स्वतंत्र होण्याअगोदर खाजगी सावकारांची ही प्रथा सुरू झाली आहे. या खाजगी सावकारांना आजतागायत कुणाचेही भय नाही. ही कीड संपण्याऐवजी उलट वाढत गेली आहे. अनेक शेतकऱ्यांना या खाजगी सावकारांनी गिळले आहे. अनेक कायदे केले तरीही शेतकऱ्यांना खाजगी सावकारांपासून कोणीही वाचवू शकले नाही.
बँकेच्या व्याज दरापेक्षा खाजगी सावकारांचे व्याज अधिक-
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना व्याज दर ठरवून दिले आहे. रिजर्व बँकेच्या आदेशानुसार बँका कर्ज वितरित करतात आणि त्यानुसारच व्याज वसुली करतात. राष्ट्रीय बँका कमी व्याज दराने शेतकऱ्यांना कर्ज वितरित करतात. तरीही जिल्ह्यातील खाजगी सावकार अव्वा च्या सव्वा दरात व्याजाने शेतकऱ्यांना रकमा देतात आणि व्याजाच्या बदल्यात या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करतात. 20 ते 30 टक्के या खाजगी सावकारांचा व्याज दर असतो आणि शेतकरी या दराने कर्जाची रक्कम फेडू शकत नाही. शेवटी नाईलाजाने आपल्याच शेतात त्याला शेतमजूर म्हणून काम करावे लागते.

महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 सुधारित कायदा-महाराष्ट्र राज्य शासनाने बेकायदेशीर सावकरीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी दमदार पावले टाकली आहेत. या बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी राज्यभर सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यात लागू केला आहे. या नव्या कायद्यानुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास पाच वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षेची तरतूद केली आहे. या सावकारी कायद्यातील प्रमुख बाबीमध्ये परवाना धारक सावकारांना शेतकऱ्यांना पिकासाठी किंवा शेतीसाठी कर्ज देताना त्यांची स्थावर मालमत्ता आता तारण घेता येणार नाही. तसेच कर्जाच्या मुद्दलापेक्षा जास्त व्याज घेता येणार नाही. तसेच दर तीन महिन्याला शेतकऱ्याला पावती देणे बंधनकारक केले आहे आणि दरवर्षी सावकारी परवान्याचे नूतनीकरण आवश्यक करण्यात आले आहे. 16 जानेवारी 2014 पासून हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला आहे.

कासेगाव येथील एका शेतकऱ्याची चार एकर जमीन सावकाराने लाटली -
दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगाव येथील महादेव येडके या शेतकऱ्याने 80 हजार रुपयांत 4 एकर शेतजमीन एका खासगी सावकाराला लिहून दिली होती. संबंधित शेतकऱ्याने 80 हजार रुपयांची रक्कम व्याजा सहित फेडून देखील खासगी सावकाराने त्याची शेतजमीन लाटली आणि दुसऱ्या एका व्यक्तीला विकून टाकली. वयस्कर झालेले महादेव हे संबंधित खासगी सावकाराला वेळोवेळी विनंती करून देखील त्याची शेतजमीन त्याला परत मिळाली नाही. 16 वर्षांपासून महादेव हे मरणासन्न जीवन जगत आहेत. याकडे शासनाने लक्ष दिल्यास त्याची शेतजमीन परत मिळू शकते.

Last Updated : Mar 31, 2021, 5:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.