ETV Bharat / state

Solapur Crime News: सोलापूरमध्ये लव जिहादचा संशयावरून महाविद्यालयीन तरुणाला मारहाण; एका संशयितास अटक - लव जिहादचा मुद्दा

सोलापूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणाला लव जिहादचा संशय घेवून मारहाण करण्यात आली. 7 जून रोजी ही घटना घडली. याबाबत पिडीत तरुणाने जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

Solapur Crime News
तरुणाला मारहाण
author img

By

Published : Jun 9, 2023, 10:59 AM IST

तरुणाला मारहाण - पोलीस उपायुक्त विजय कबाडे

सोलापूर : लव जिहादचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आता याच मुद्द्यावरून तू आमच्या धर्माच्या तरुणींना फसवतो का? असे म्हणत सोलापूरमध्ये एका तरूणाला मारहाण करण्यात आली. असा जाब विचारत संबंधित तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. पीडित तरुणाने लव जिहादचा देखील तक्रारीमध्ये उल्लेख केला आहे. या घटनेमुळे सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल : सोलापूर पोलिसांनी अतिशय सावध भूमिका घेत जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. पोलिसांनी पीडित तरुणाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून 10 ते 15 जणांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जेलरोड पोलिसांनी एका संशयितास अटक करून कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

डोक्यावर व पाठीवर मारहाण : सोलापूर शहरातील महाविद्यालयात एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याकडे काही तरूणी आल्या. नोकरीनिमित्त एका कॉफी शॉपमध्ये बोलत बसल्या होत्या. काही वेळाने संबंधित तरुण हा पायी चालत निघाला. त्या मुलींनी त्याला आपल्या दुचाकी वाहनावरून सोडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या अन्य एका समाजाचे तरुण आले तू आमच्या धर्मातील मुलींसोबत का बोलतो? असा जाब विचारू लागले. काही समजण्याअगोदर 10 ते 15 जणांचे टोळके पीडित तरुणास अक्कलकोट रोड परिसरात असलेल्या एमआयडीसीत घेऊन गेले. त्यास जबर मारहाण केली. त्याच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण करून महाविद्यालयीन तरुणास जखमी करण्यात आले.

लाकडाने व दगडाने मारहाण : जखमी झालेल्या पीडित तरुणाने मारहाण करणाऱ्याचे मोबाईल नंबर घेतले होते. पीडित तरुणाने तक्रार देताना महत्वाची बाब नमूद केली आहे. हिंदू मुलीला फसवतो का? लव जिहाद करतो का? असे म्हणत 10 ते 15 जणांनी लाकडाने व दगडाने मारहाण केली आहे. या घटनेने सोलापूर शहर व जिल्हा प्रशासन हादरले आहे. कारण काही संघटना आज देखील तरुणांची माथी भडकवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोलापूर पोलिसांचे आवाहन : पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे कोणी षडयंत्र करत असेल तर सोलापूर पोलीस त्यांवर कठोर कारवाई करतील. सोशल मीडियावर सोलापूर सायबर पोलीस नजर ठेवून आहे. जातीय सलोखा ठेवा, भाईचारा ठेवा, शहराच्या शांततेल गालबोट लागेल असे कृत्य करू नका असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. Prasad Lad On Love Jihad Law: लव जिहाद कायदा लवकर आणला पाहिजे - प्रसाद लाड
  2. Rais Shaikh on Love Jihad : आमदार रईस शेख यांचे थेट सरकारलाच आव्हान; लव जिहाद प्रकरणांची आकडेवारी सिद्ध करून दाखवा...
  3. Fatwa Against Love Jihad: आता लव्ह जिहादच्या विरोधातच फतवा.. म्हणाले, 'मुस्लिम ओळख लपवून प्रेम करणे चुकीचे'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.