ETV Bharat / state

आयपीएल सट्टाबाजार : सोलापूर पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, ६ अटकेत

author img

By

Published : Nov 9, 2020, 8:51 PM IST

सध्या सुरू असलेल्या आयपीएल मॅचमुळे सट्टा बाजाराला उधाण आले होते. महाराष्ट्र व कर्नाटक असे दोन राज्यातील सोलापूर व गुलबर्गा या शहरात हा सट्टाबाजार चालत होता. या सट्टाबाजांवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे.

Confiscated goods.
जप्त करण्यात आलेला माल.

सोलापूर - शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) दरम्यान मॅचवर पैज लावण्यासाठी लोकांना अधिक रकमेचे आमिष दाखवून लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सोलापूर व गुलबर्गा असे कनेक्शन उघडकीस आणले आहे. यामध्ये सहा संशयित सट्टाबाजी करणाऱ्याना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 38 लाख 44 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर कारवाईबाबत माहिती देताना.

सध्या सुरू असलेल्या आयपीएल मॅचमुळे सट्टा बाजाराला उधाण आले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक असे दोन राज्यातील सोलापूर व गुलबर्गा या शहरात हा सट्टाबाजार चालत होता. या सट्टाबाजांवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चेतन रामचंद्र वन्नाल (वय 26 वर्ष, रा. गांधीनगर झोपडपट्टी नं. 3), विघ्नेश नागनाथ गाजूल (वय 24 वर्ष रा. भद्रावती पेठ), राजेश कुरापाटी (रा. अशोक चौक), अतुल सुरेश शिरशेट्टी (रा. अवंतीनगर), प्रदीप मल्लय्या कारंजे (रा. भवानी पेठ), भीमाशंकर सुपेकर (रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - डहाणूत आयपीएल सामान्यावर सट्टा लावणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई; एकाला अटक

38 लाखांचा मुद्देमाल जप्त -

संशयित आरोपींकडून 3 लॅपटॉप, 1 टॅब, 13 मोबाइल हँडसेट, 1 माईक, 3 लॅपटॉप चार्जर, 1 हॉट लाईन, मॉडेम , सेटअप बॉक्स, सॅमसंग कंपनीचा टीव्ही, डिव्हीआर, तसेच 1 इनोव्हा,1 क्रिस्ट कार, मारुती ब्रिझा, असा एकूण 38 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेने जप्त केला आहे.

हा आयपीएल सट्टा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात चालत होता. पोलिसांनी दोन राज्यात चालणारा हा सट्टा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. अद्याप मुख्य सूत्रधारास सापडलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.