ETV Bharat / state

जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी आणि जिल्ह्यात येण्यासाठी तब्बल 16 हजार 74 अर्ज - सोलापूर कोरोना अपडेट

राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 541 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पंजाबमधील कपूरथळा येथूनही दहा नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली.

सोलापूर
सोलापूर
author img

By

Published : May 9, 2020, 5:21 PM IST

सोलापूर - जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी आणि जिल्ह्यात येण्यासाठी तब्बल 16 हजार 74 जणांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. यातील 10 हजार 162 अर्ज प्रलंबित राहिले आहेत. तर 4 हजार 317 जणांना परवानगी नाकारली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 541 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पंजाबमधील कपूरथळा येथूनही दहा नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली.

राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात जाण्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अर्जानुसार परवानगी देण्यात येत आहे.

1 मेपासून आजपर्यंत 16074 अर्ज प्राप्त झाले असून 1595 जणांना परवानगी देण्यात आली आहे. 4317 अर्जांना परवानगी नाकारली असून 10162 अर्ज प्रलंबित आहेत. नाकारण्यात आलेले बहुतांशी अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले नसल्यामुळे नाकारले आहेत. इतर जिल्ह्यातून राज्यातून मान्यता मिळाली नसल्याने अर्ज प्रलंबित आहेत. वैद्यकीय कारणाबाबतचे अर्ज तत्काळ समन्वय साधून परवानगी दिली जात आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एकूण 5759 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात जाण्यासाठी 2311 जणांनी अर्ज केले आहेत. इतर काही प्रमुख जिल्ह्यात नावे आणि अर्ज केलेल्या नागरिकांची संख्या पुढीलप्रमाणे - नगर -141, औरंगाबाद - 114, बीड-160, कोल्हापूर -224, लातूर -124, मुंबई शहर-92, मुंबई उपनगर-86, नांदेड-158, उस्मानाबाद -177, सांगली -297, सातारा -223, रायगड -171 इतके अर्ज ऑनलाईन आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.