ETV Bharat / state

साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात, कर्नाटकातील चार भाविकांचा मृत्यू - कर्नाटक कार करमाळा तालुका अपघात

Solapur accident news शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या कर्नाटकातील भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज (27 डिसेंबर 2023) रोजी पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावानजीक फिसरे रस्त्यावर झाला आहे. अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृत भाविक हे कर्नाटक राज्यातील आहेत.

Solapur accident news
Solapur accident news
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 12:09 PM IST

Updated : Dec 27, 2023, 12:17 PM IST

सोलापूर Solapur accident news : करमाळा तालुक्यात कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. प्रवासी साखरझोपेत असतानाच चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत भाविक हे कर्नाटक राज्यातील रहिवाशी होते.

  • कंटेनर आणि चारचाकीचा अपघात एवढा भीषण होता की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. श्रीशैल चंदेशा कुंभार (वय-५६, गुलबर्गा),शशिकला श्रीशैल कुंभार (वय-५०, गुलबर्गा) आणि ज्योती दिपक हिरेमठ (वय-३८, बागलकोट) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर शारदा दिपक हिरेमठ (वय-७०, हुबळी) यांचा करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

भाविकांच्या वाहनाची आणि कंटेनरची समोरासमोर धडक- पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील भाविक शिर्डी येथील साईच्या दर्शनासाठी निघाले होते. आज पहाटेच्या सुमारास करमाळा तालुक्यातील सालसे गावाकडून तवेरानं ( गाडी क्र. के.ए. ३२- एन. ०६३१) शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते. कंटेनर ( वाहन क्रमांक आर.जे. ०६ जी.सी. २४८६) हा फरशी घेऊन करमाळ्याकडून सालसे गावाच्या दिशेने निघाला होता. पहाटे पावणे सहा ते सहाच्या सुमारास पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. पांडे गावच्या युवकांनी बचावकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

आठ महिन्यांचा चिमुकला सुखरूप बचावला- साईच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या तवेरा आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. पांडे गावचे ग्रामस्थ साखर झोपेत असताना अपघाताचा जोरात आवाज आला. अपघाताचा आवाज येताच पांडे गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. चारचाकी बाजूला करत जखमींना बाहेर काढले. प्रसंगावधान राखून या युवकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना कळवत मदतकार्य सुरू ठेवले. अपघातात गाडी ड्रायव्हर श्रीकांत राजकुमार चव्हाण (वय-२०, गुलबर्गा) यांना किरकोळ जखमी झाला आहे. तर आठ महिन्यांचा चिमुकला सुखरूप बचावला आहे. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

  • रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेषत: पहाटेच्यावेळी वाहनांचे अपघात अधिक होतात. हे लक्षात घेता वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा-

  1. काँग्रेस आमदाराच्या कारचा भीषण अपघात; ट्रॅक्टरला दिली जोरदार धडक, एक ठार
  2. नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, आठ जण जागीच ठार, एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

Last Updated : Dec 27, 2023, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.