सोलापूर- जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी 61 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 476 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधितांमध्ये 7 जण बार्शी तालुक्यातील आहेत तर 5 जण हे अक्कलकोट तालूक्यातील आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 61 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल आला.
61 कोरोना पॉझिटिव्ह अहवालांमध्ये 45 पुरूष आणि 16 स्त्रियांचा समावेश आहे.मृत्यू झालेल्या 5 जणांमध्ये 4 पुरुष आणि एक स्त्री आहे. 48 अहवाल हे प्रलंबित आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.