ETV Bharat / state

वडिलांसाठी मुली मैदानात.. सुशीलकुमार शिंदेंसाठी प्रणिती, स्मृती व प्रीती यांचे मतदारांना आवाहन

स्मृती शिंदे यांनी सुशिलकुमार शिंदेंना निवडून देण्याचे आवाहन लोकांना केले. प्रणिती शिंदे म्हणाल्या, की ही निवडणूक देशाचे अस्तित्व वाचवण्याची निवडणूक आहे. ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. त्यामुळे सगळ्यांनी काँग्रेसला मतदान करावे.

author img

By

Published : Mar 27, 2019, 1:20 PM IST

प्रणिती आणि स्मृती शिंदे

सोलापूर - निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत आहे. प्रत्येक पक्ष, उमेदवार जोरदार प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. सोलापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे प्रचाराला लागले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या मुली आज प्रचारात उतरलेल्या दिसल्या. आमदार प्रणितीसह स्मृती आणि प्रीती यांनी वडिलांच्या प्रचारात सहभाग घेतला.

सुशिलकुमार शिंदेंना निवडून देण्याचं आवाहन त्यांच्या मुलींनी केलं

सुशिलकुमार शिंदे यांच्या तीन मुली आहेत. यातील प्रणिती शिंदे या राजकारणात आहेत. तर स्मृती शिंदे या दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट निर्मिती करतात. आज त्यांच्या तिन्ही मुलींनी प्रचार रॅलीत सहभाग घेतला. मुलींसह स्वतः सुशिलकुमार शिंदेही प्रचार रॅलीत दिसून आले.

Intro:सोलापूर : लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते नेत्यांसाठी प्रचार करतात.नेत्यांची मुलंही मग मागे न राहता कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजकीय प्रचाराला सुरुवात करतात. मुलगा असेल तर त्याचा असा खास ग्रुप असतो पण त्या तुलनेत मुलीच्या मैत्रिणी निवडणूकीच्या गदरोळापासून चार हात असतात.
पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न मानणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांच्या मुली आज वडिलांच्या रॅलीत उतल्याचं दिसून आल्या.

Body:सुशीलकुमार शिंदे यांना स्मृती,प्रीती आणि प्रणिती अशा तीन मुली आहेत.त्यातल्या प्रणिती या आमदार असल्याने लोकांना माहीत आहेत पण कौटुंबिक जबाबदारीमुळं स्मृती आणि प्रीती या कधी लोकांत मिसळत नाहीत.विशेष म्हणजे चित्रपट आणि मालिका निर्मितीत नेहमी व्यस्त असणाऱ्या सोबो फिल्म्सच्या निर्मात्या स्मृती शिंदे यांनी आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ देऊन निवडणूक रॅलीत सहभागी झाल्याच्या पाहायला मिळाल्या.एसीच्या हवेत राहणाऱ्या या शिंदेंच्या कुटुंबातील सदस्यांना आज भर उन्हांत फक्त वडिलांच्या विजयासाठी मैदानात उतरावं लागलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय इटीव्ही भारतचे रिपोर्टर प्रवीण सपकाळ यांनी....

Conclusion:इटीव्हीशी बोलताना बऱ्यापैकी राजकारण करणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांनी राजकीय उत्तर दिलं पण चित्रपट आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या स्मृती शिंदे यांनी आपल्या वडिलांची आपण निवडणूकीत येतो असं सांगतानाच आपल्या वडिलांना निवडून देण्याचं आवाहन सोलापूरकरांना केलंय....म्हणून वडिलांच्या सन्मानासाठी मुली उतरल्या निवडणुकीच्या मैदानात म्हणावं लागेल...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.