सोलापूर - करमाळा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या रश्मी बागल यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची करमाळ्यात सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित जनतेला, 'रश्मी बागल या आमदार म्हणून विधानसभेत पाहिजेत' त्यांना निवडून द्या, असे आव्हान केले.
हेही वाचा... एकनाथ खडसेंना व्हायचंय पंतप्रधान!
राज्याची स्वतःची पीक विमा कंपनी काढणार
राज्यात पिकांचे नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्याकंडून विम्याचे हप्ते गोळा केले, मात्र त्यांना नुकसानभरपाई दिली नाही. यासाठी शिवसेनेने आंदोलन देखील केले होते, याची आठवण करत उद्धव ठाकरेंनी या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सरकार आल्यानंतर राज्यात सरकारचीच पीक विमा कंपनी काढणार असल्याचे वक्तव्य केले. ही निवडणूक आता जनतेने त्यांच्या हातात घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार रश्मी बागल या आमदार मला विधानसभेत पाहिजेत. त्यांना निवडून देण्याची जबाबदारी जनतेच्या हातात आहे, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी करमाळा येथे बोलताना काढले.
हेही वाचा... मोदी हे आंतरराष्ट्रीय पंतप्रधान; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल
करमाळ्यातील आदिनाथ मकाई साखर कारखान्याची काळजी करू नका. त्यांची कामे झाली आहेत. मंत्री तानाजी सावंत यांनी हे त्यांच्या हाती घेतले आहे. तसेच शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करणाऱ्या आमदार नारायण पाटील यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी टीका केली.