सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तीनही उमेदवारांनी आजसोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसकडून देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून अॅड. प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून डॉ. जयसिद्धयेश्वर महास्वामी यांनी आपले अर्ज आज भरले.
काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे सकाळी सात वाजल्यापासून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून साडे नऊ वाजता पार्क चौकातून मिरवणुकी सुरुवात करून आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात भरला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रणिती शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, भारत भालके, माजी आमदार दिलीप माने, प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे भारत जाधव, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासह सर्वच मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले दुसरे तुल्यबळ उमेदवार प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीकडून आज दुपारी ११ नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रकाश आंबेडकरांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांची पदयात्रा बुधवार पेठेतून शहाराच्या बळीवेस, टिळक चौक, माणिक चौक, विजापूर वेस, बेगमपेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली.
जयसिध्देश्वर स्वामीचेही शक्ती प्रदर्शन -
भाजपचे डॉ.जयसिद्धयेश्वर महास्वामी यांनी आज हेरिटेज येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यानंतर त्यांनीथेट उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गाठत अर्ज भरला. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार तानाजीराव सावंत, संपर्कप्रमुखआमदारनिलम गोरे, जिल्हा प्रमुख महेश कोठे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, आमदारप्रशांत परिचारक, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार, शहर अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभाताई बनशेट्टी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.