ETV Bharat / state

माढ्यात भाजपचा प्रचार केल्यामुळे शिंदे समर्थकांचा निमगावातील वस्तीवर हल्ला? - माढा लोकसभा निवडणूक

माढा लोकसभेचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला म्हणून माढ्यात प्रहार संघटनेच्या अतुल खुपसे यांच्या वस्तीवर हल्ला करण्यात आला आहे.

खुपसे वस्तीवरील घरांना लागलेली आग
author img

By

Published : Apr 27, 2019, 8:15 PM IST

सोलापूर - भाजपचा प्रचार केला म्हणून राष्ट्रवादीचे माढ्याचे उमेदवार संजय शिंदे यांच्या समर्थकांनी प्रहार संघटनेच्या अतुल खुपसे यांच्या वस्तीवर हल्ला केला, अशी तक्रार खुपसे यांनी सोलापूर ग्रामीण पोलिसात नोंदवली आहे.

खुपसे वस्तीवर हल्ला

लोकसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला म्हणून माढ्यात प्रहार संघटनेच्या अतुल खुपसे यांच्या वस्तीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात शेतगड्यांच्या वस्त्याही पेटवून देण्यात आल्या आहेत. हा हल्ला माढ्याचे उमेदवार संजय शिंदे आणि त्यांचे बंधू तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार बबन शिंदे यांच्या चिथावणीने झाल्याचा आरोप त्यांनी केला.

माढा लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तत्पूर्वी शिंदे बंधू यांचे गाव असलेल्या निमगावात राज्याचे गृहमंत्री राम शिंदे यांचा प्रचार झाला. गेल्या ६९ वर्षांत शिंदे विरोधकांची निमगावात सभा झाली नव्हती. पण ग्रुप ग्रामपंचायत असल्याने उपळवटे येथील प्रहार संघटेनेचे अतुल खुपसे यांनी पुढाकार घेऊन निमगावात भाजपची सभा घेतली. त्यात खुपसे यांनी शिंदे बंधूंच्या विरोधात आक्रमक भाषण केले. तसेच २३ तारखेच्या मतदानाला स्वतः पोलिंग एजंट म्हणून निमगाव मतदान केंद्रांत आले. त्यानंतर वादही झाला आणि फेरमतदानाची मागणी करण्यात आली. यासर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास शिंदे समर्थकांनी खुपसे वस्तीवर हल्ला केला. त्यात शेतगड्यांच्या बायका-मुलींना मारहाण झाली असून त्यांच्या वस्त्याही पेटवून देण्यात आल्या. याप्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून अतुल खूपसे यांनी सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना लेखी तक्रार अर्ज देत संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

दुसऱ्या बाजूला अतुल खूपसे यांचे गावातील स्थानिक राजकारणात वैमनस्य आहे. शुक्रवारी गावातील यात्रेनंतर त्यांच्या पूर्वाश्रमीच्या विरोधकांनी हा हल्ला केला असावा असे बोलले जात आहे. मात्र, गेल्या १० वर्षांत हा वाद संपला होता. शिवाय ज्यांचे नाव पुढे केले जात आहे, ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे तो वाद मिटला आहे, अशी माहिती खुपसेंनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. एकूणच या हल्ल्यामागे राजकारण हे एकच कारण असल्याची चर्चा सध्या माढ्यात रंगली आहे.

Intro:सोलापूर : लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला म्हणून माढ्यात प्रहार संघटनेच्या अतुल खूपसे यांच्या वस्तीवर हल्ला करण्यात आलाय.शिवाय शेतगड्यांच्या वस्त्याही पेटवून देण्यात आल्या आहेत. सदरचा प्रकार भाजपचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माढ्याचे उमेदवार संजय शिंदे आणि त्यांचे बंधू तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार बबन शिंदे यांच्या चिथावणीने झाल्याचा आरोप अतुल खूपसे यांनी केलाय..तशा आशयाची तक्रारही खूपसे यांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांना दिला आहे.Body:
गेल्या 23 तारखेला माढा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे.तत्पूर्वी शिंदे बंधू यांचं गाव असलेल्या निमगावात राज्याचे गृहमंत्री राम शिंदे यांची प्रचार झाली.गेल्या 69 वर्षांत शिंदे विरोधकांची निमगावात सभा झाली नव्हती.पण ग्रुप ग्रामपंचायत असल्याने उपळवटे येथील प्रहार अतुल खूपसे यांनी पुढाकार घेऊन निमगावात भाजपची सभा घेतली होती. त्यात खूपसे यांनी शिंदे बंधूंच्या विरोधात आक्रमक भाषण केलं तसंच 23 तारखेच्या मतदानाला स्वतः पोलिंग एजंट म्हणून निमगाव मतदान केंद्रांत आले. त्यानंतर वादही झाला फेरमतदानाची मागणी करण्यात आली. यासर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी साडे तीनच्या सुमारास शिंदे समर्थकांनी अतुल खूपसे वस्तीवर आहेत असं गृहीत धरून हल्ला केला.त्यात शेतगड्यांच्या बायकां-मुलींना मार लागला.शिवाय वस्त्याही पेटवून दिल्या. याप्रकरणाचा पोलीस तपास सुरु असून अतुल खूपसे यांनी सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना लेखी तक्रारी अर्ज देत संरक्षण देण्याची मागणी केलीय...Conclusion:दुसऱ्याबाजूला अतुल खूपसे यांचं गावातील स्थानिक राजकारणात वैमानस्य आहे.काल गावातील यात्रेनंतर त्यांच्या पूर्वाश्रमीच्या विरोधकांनी हा हल्ला केल्याचा खुलासा केला जात आहे.मात्र गेल्या 10 वर्षांत हा वाद संपला होता.शिवाय ज्यांचं नांव पुढं केलं जातं आहे ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत.त्यामुळं तो वाद मिटला होता असंही अतुल खूपसे पाटील यांनी इटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं आहे.. एकूणच या हल्ल्यामागे राजकरण हे एकच कारण असल्याची चर्चा माढ्यात रंगलीय....
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.