सोलापूर : आयटी पार्कच्या उदघाटनसाठी शरद पवार हे सोलापूरात आले होते. विमानतळ ते डोंणगाव मार्गावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांनी जेसीबीतुन पुष्पवृष्टी करून शरद पवारांचे जंगी स्वागत केले. अजित पवार हे भाजप बरोबर गेले असले तरी सोलापूरातील राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली नाही. आजही हजारो कार्यकर्ते शरद पवार यांच्या गटात आहेत. सोलापूर शहराचे माजी महापौर महेश कोठे यांच्या पुढाकाराने सोलापूर शहराजवळ आयटी पार्क स्थापन करणात आले आहे. त्याच्या उदघाटनसाठी शरद पवार सोलापूरात आले होते. येथून मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला अशा दौऱ्यावर रवाना झाले.
शरद पवार भारावले : रविवारी सकाळी शरद पवार हे सोलापूर विमानतळ या ठिकाणी पोहोचले. विमानतळ ते डोंणगाव दरम्यान जाताना मोदी, सात रस्ता, मरीआई चौक दरम्यान कार्यकर्त्यांनी जेसीबीमधून शरद पवारांचे जंगी स्वागत केले. चार जेसीबीमधून पुष्पवृष्टी होताना पाहून शरद पवार भारावले. शरद पवार वाहनांतून बाहेर येऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत होते. तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन असल्याची चर्चा सोलापूरात सुरू आहे.
आठशे कोटींची गुंतवणूक : सोलापूर शहराजवळील डोणगाव रस्त्यावरील ६५ एकर जागेत आर्यन्स ग्रुपच्या माध्यमातून, आठशे कोटींची गुंतवणूक करून पहिले आयटी पार्क साकारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. माजी महापौर महेश कोठे व आर्यन्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप यांनी हे आयटी पार्कसाठी अथक परिश्रम घेतले. रविवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, पंचशील ग्रुपचे अतुल चोरडिया, सतीश मगर, आर्यन ग्रुपचे चेअरमन मुकुंद जगताप, आर्यन ग्रुपचे एमडी स्मिता जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
सोलापूरला उद्योगांना चालना मिळणार : सोलापूरात स्थापन होणाऱ्या आयटी पार्कमध्ये आयटीसी संलग्न अशा विविध कंपन्या येणार आहेत. सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्यांचा देखील समावेश आहे. मार्च अखेर या आयटी पार्कचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. आयटीपार्कमुळे दहा ते पंधरा हजार तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे महेश कोठे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. आयटी पार्कमुळे शहरात आयटी क्षेत्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. या आयटी पार्कच्या माध्यमातून मोठ्या आयटी कंपन्या, आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्स, उद्योजक आणि त्यांच्याशी संबंधित उद्योगांना आकर्षित केले जाणार आहे. या माध्यमातून सोलापूरमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांसाठी एक पोषक वातावरण तयार होणार असल्याचे कोठे यांनी सांगितले.
दहा ते पंधरा हजार तरुणांना रोजगार : आयटी पार्कचे भूमिपूजन झाल्यानंतर प्रयक्ष कामकाज सुरू होणार आहे. येत्या काही महिन्यांत सोलापूरच्या आयटी तरुणांना या ठिकाणी नोकरी मिळेल. पहिल्या टप्प्यात टेक्निकलच्या दीड हजार तर नॉन टेक्निकलच्या तीन हजार तरुणांना सुरुवातीच्या वर्षंभरात काम मिळेल. पुढील तीन वर्षांमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यानिमित्ताने मी गेल्या सहा वर्षांचे स्वप्न पूर्ण करत आहे.
आयटी पार्कमध्ये भारतीय बनावटीचे सर्च इंजिन असणार : सोलापूरात साकारणाऱ्या आयटीपार्कमध्ये आर्यन्स ग्रुप महत्वाची भूमिका आहे. आर्यन ग्रुप अन्य क्षेत्रात काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर देखील काम करत आहे. आयटीपार्क मधील कंपन्या पूर्णत भारतीय बनावटीचे सर्च इंजिन बनवणार आहे. कंपनीसाठी हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कारण गुगल किंवा इतर सर्च इंजिन देशाबाहेरील आहेत. ज्यामुळे भारताच्या दृष्टीने हा एक सुरक्षेचा विषय आहे. याबरोबरच कंपनी भारतीय बनावटीचे वेब ब्राउजर देखील बनवत आहे. जे पूर्णपणे सुरक्षित असेल. आयटी पार्कसह इतर प्रकल्पांसाठी जागा मिळाल्यास ८०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होणार आहे.
सिंगापूरच्या धर्तीवर इमारत उभी करणार : आयटी पार्कची ही इमारत सिंगापूरच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी तयार होणारे रोबोट, ज्वेलरी, किचन, मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये व अन्य सर्व ठिकाणी त्याचे काम चालेल सर्वांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत अशी माहिती, आर्यन ग्रुपचे संचालक संजय शेंडगे यांनी दिली आहे.
हेही वाचा -