पंढरपूर(सोलापूर) : सरकारचे प्रकल्प चांगले प्रकल्प असतात. ते प्रकल्प उभे करत असतांना सरकारने स्थानिक नागरिकांना विचारात घेऊन प्रकल्प उभे करावे. सरकारने पोलीस बाळाचा वापर करण्यापेक्षा स्थानिक नागरिकांबरोबर चर्चा करून चर्चेतून योग्य मार्ग काढावा असा सल्ला पवार यांनी राज्यसरकारला दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा बारसू रिफायनरीला विरोध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . ते आज पंढरपूर येथील श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेल्या शेतकरी मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये शरद बोलत होते.
महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत : देशात सर्वात जास्त राज्यांमध्ये बिगर भाजप पक्षाचे सरकार आहे. कर्नाटकात देखील काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे एका अहवालातून समजते त्यामुळे भविष्यात विरोधी पक्षाची एकजूट करून भाजप समोर सक्षम पर्याय दिला जाईल, असेही बोलताना पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेऊ नये यासाठी भाजपच्या अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. राजीनामा नाट्य झाल्यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याची टीका भाजपकडून होत होती. मात्र, आत्ता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट महाविकास आघाडी म्हणून कामाला लागणार आहे,असे पवार यांनी जाहीर केले. सुप्रिया म्हणाली की ती कोणतीही नवीन जबाबदारी घेण्यास तयार नाही. त्यामुळे २०२४ पूर्वी त्यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात येणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
कृषी धोरणाबाबत केंद्र सरकावर टीका : केंद्र सरकारकडे कृषी धोरणाबाबत योग्य धोरण नसल्याची टीका पवार यांनी केली. जेव्हा देशात एखाद्या पिकाचे उत्पादन जास्त असते तेव्हा सरकार त्या पिकाची आयात करते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळणे गरजेचे असल्याचेही शरद पवार म्हणाले.
अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश : राज्यात नव्याने उदयास आलेले साखरसम्राट म्हणून ओळखले जाणारे अभिजित पाटील कोणत्या पक्षात जाणार, असा प्रश्न पडला होता. सर्व पक्षांशी चांगले संबंध असलेले अभिजित पाटील यांनी अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अनेक दावेदारांचा पराभव करून अभिजित पाटील प्रसिद्धीच्या झोतात आले होते. अभिजित पाटील हे आज साखर कारखाना क्षेत्रातील मोठे नाव आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतच त्यांची भाजपशीही जवळीक होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अभिजित पाटील हे भाजपसमोर तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.