ETV Bharat / state

Shantabai Kale Struggle for House : कुणी घर देत का घर; जेष्ठ लावणी समाज्ञीची घरासाठी परवड, आमदार बच्चू कडूंकडून घराची अपेक्षा - कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक डॉ किशोर काळे

Shantabai Kale Struggle for House : एकेकाळच्या प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी तसंच 'कोल्हाट्याचं पोर' या पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या मातोश्री शांताबाई काळे यांचा घरासाठी संघर्ष सुरुच आहे. सरकार किंवा आमदार बच्चू कडूंनी मला घर बाधून द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

Shantabai Kale Struggle for House
Shantabai Kale Struggle for House
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 11:59 AM IST

Updated : Sep 23, 2023, 7:34 PM IST

जेष्ठ लावणी समाज्ञीची घरासाठी परवड

सोलापूर Shantabai Kale Struggle for House : 'कोल्हाट्याचं पोर' या पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या मातोश्री व प्रसिद्ध लावणी कलावंत शांताबाई काळे यांची घरासाठीची परवड अजूनही सुरूच आहे. अनेकदा प्रयत्न करूनही त्या घरापासून आजतागायत वंचितच आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांपासून ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत त्यांनी प्रयत्न करून पाहिले, मात्र कुणीही त्यांच्या समस्येची दखल घेतली नाही. फेब्रुवारी महिन्यात प्रहार संघटनेचे बच्चू कडूंनी घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते अजूनही आश्वासनच राहिलंय. शांताबाई काळे या सध्या भाड्याच्या घरात राहून आयुष्य जगत आहेत. मला फक्त घराची अपेक्षा आहे, बच्चू कडू किंवा शासन कोणीही मला घर बांधून द्यावं, असं आर्जव शांताबाई काळे करतायत.

पत्रकार परिषदेत शांताबाई काळेंच्या घराबाबत विचारला होता प्रश्न : 'प्रहार'चे आमदार बच्चू कडू हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी सातरस्ता येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली होती. फेब्रुवारी महिन्यात बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांताबाई काळेंना करमाळा तालुक्यातील नेरळे गावात घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. यावर पत्रकारांनी शांताबाई काळेंना घर बांधून दिलं नाही. त्या आजतागायत भटकंती करत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा घर बांधून देण्याचं आश्वासन दिलंय. यावर शांताबाई काळेंनी खुलासा करत काही गैरसमज झाला असेल, पण मला आजही बच्चू कडूंकडून घराची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलंय.

माझा मुलगा जिवंत असता तर ही वेळ आली नसती : घरासाठी अर्ज-विनंत्या अन् पाठपुरावा केल्यानंतरही काहीच होत नसल्यानं शांताबाई काळेंनी खंत व्यक्त करताना म्हटलंय की, माझा मुलगा जिवंत असता तर अशी भटकण्याची वेळ माझ्यावर आली नसती. ज्यांच्याकडे श्रीमंती आहे अशा लोकांना सरकार घर उपलब्ध करुन देतंय. मात्र आमच्यासारख्या गरिबांकडं लक्ष द्यायला कोणी नाही. मला शासनानं किंवा बच्चू कडूंनी एका लेखकाच्या आईला साजेल असं घर बांधून द्यावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय. प्रसिद्ध लावणी कलावंत शांताबाई काळेंना शासनानं करमाळा तालुक्यातील नेरळे गावात जागा उपलब्ध करून दिलीय. मात्र त्या खुल्या जागेवर घर बांधून देण्याची मागणी शांताबाई काळेंनी केलीय.

हेही वाचा :

  1. Lavani Artist Begging : एकेकाळी आपल्या अदाकारी अन् सौंदर्यानं राज्य गाजवणारी लावणी कलावंत आता रस्त्यावर मागतेय भिक
  2. Chain snatching in Nashik : चोरांचे नाशिक पोलिसांना आव्हान, चक्क केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील सोनसाखळी पळविली!
  3. MLA Bachchu Kadu: आमदार बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँक कार्यकारिणी मंडळाची पहिलीच बैठक फसली

Last Updated : Sep 23, 2023, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.