ETV Bharat / state

Pandharpur Vitthal Temple Donation: पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी पावणे दोन कोटी रुपयांचे गुप्तदान

आषाढी एकादशीच्या सोहळ्याला पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी मोठ्या प्रमाणावर दान येत असते. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि वसंत पंचमी या विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या चरणी जालन्यातील एका महिलेने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे दान दिले आहे. सोन्याचा मुकुट आणि बरेच काही दागिने दान स्वरूपात मिळाले आहेत.

Pandharpur Vitthal Temple Donation
विठ्ठल मंदिर, पंढरपूर
author img

By

Published : Jan 26, 2023, 10:12 PM IST

सोलापूर : आज प्रजासत्ताक दिन व वसंतपंचमीच्या मुहूर्तावर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होत आहे. यानिमित्त देशभरातून लाभो भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. आजच्या सोहळ्यासाठी पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी सर्वांत मोठे दान अर्पण करण्यात आले आहे. तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने नाव न जाहीर करण्याच्या शर्तीवर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले आहेत. त्या दानशूर महिला या जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते.

दानामध्ये 'या' अमूल्य वस्तू : आज पंढरपूरमध्ये विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या शाही विवाह सोहळ्याची लगबग सुरू होती. या पार्श्वभूमीवर या भाविक महिलेने दिलेले दान महत्त्वाचे ठरते. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी माहिती दिली की, या दानामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला सोन्याचे मुकुट, मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी अशी सोन्याची दागिने दान केली आहेत. देवाच्या रोजच्या पूजेसाठी लागणारे चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि चांदीचा आरसा अशा वस्तू या दानामध्ये समाविष्ट आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विठ्ठलाच्या चरणी भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर दान येत आहे. मागील आषाढी एकादशीच्या सोहळ्यालासुद्धा एक कोटी रुपयांचा मुकुट विठ्ठलाच्या चरणी दान करण्यात आला होता. मागच्या ५० वर्षांतील हे सर्वांत मोठे दान असल्याचे पंढरपूर देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले आहे.

फुलांची आकर्षक सजावट : आज वसंतपंचमी सोबतच ७४ व्या प्रजासत्ताक दिन आहे. यानिमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आणि देवाच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट व आरास करण्यात आली आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी खास चेन्नई व बंगळुरु येथून रेशमाचे पांढरे वस्त्र आणण्यात आले आहेत. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर संपर्कात असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केल्याचे चित्र विठ्ठल मंदिरा मध्ये दिसत आहे.

हेही वाचा : India First Covid Nasal Vaccine : भारत बायोटेकची कोविड लस 'इन्कोव्हॅक' लाँच, नाकातून देता येणारी पहिली भारतीय लस ठरणार गेम चेंजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.