ETV Bharat / state

संजय मामांच्या हाती पुन्हा 'घड्याळ', पवारांचे दोन्ही शिष्य 'आमने सामने'? - ncp

रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर भाजपपुरस्कृत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे हे आज राष्ट्रवादी काँग्रसेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे एकेकाळाचे  हे दोन्ही पवारांचे शिष्य आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माढा लोकसभेसाठी संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह मोहिते पाटील लढत होण्याची शक्यता?
author img

By

Published : Mar 22, 2019, 5:05 PM IST

Updated : Mar 22, 2019, 5:16 PM IST

सोलापूर - लोकसभा उमेदवारीवरुन माढा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वातावरण बघून सर्वच राजकीय नेतेमंडळी निर्णय घेताना दिसत आहेत. माढा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच राष्ट्रावादीतून भाजपवासी झालेले रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर भाजपपुरस्कृत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे हे आज राष्ट्रवादी काँग्रसेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे एकेकाळाचेहे दोन्ही पवारांचे शिष्य आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मावळमधून पार्थ पवार लढणार असल्याने एकाच घरातील ३ उमेदवार नको म्हणत तरुणांना संधी देणार असल्याचे सांगत पवारांनी माढ्यातून माघार घेतली. त्यानंतर माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील लढणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मागितली होती. मात्र, माढा मतदारसंघातील आमदारांचा रणजितसिंहांच्या नावाला विरोध होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या दोन याद्या जाहीर होऊनही मोहिते पाटीलयांचे नाव त्यामध्ये नव्हते. अखेर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले.

भाजपकडून रणजितसिंह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही ऐकेकाळी पवारांचे निष्ठावाण शिष्य होते. मात्र, आता एक दूर गेला आहे तर दुसरा दूर जाऊन पुन्हा जवळ आला आहे. त्यामुळे माढ्याची लढत रंगतदार होणार हे मात्र निश्चित.

कोण आहेत संजय मामा शिंदे

  • संजय मामा शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
  • माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे ते बंधू आहेत.
  • विठ्ठल शुगर म्हैसगावचे ते चेअरमन आहेत.
  • सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक आहेत.
  • माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापती आहेत.
  • २०१४ ला संजय शिंदेंनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये अगदी थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

Intro:Body:

Sanjay mama shinde join ncp

संजय मामांच्या हाती पुन्हा 'घड्याळ', पवारांचे दोन्ही शिष्य 'आमने सामने'?

सोलापूर -  लोकसभा उमेदवारीवरुन माढा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वातावरण बघून सर्वच राजकीय नेतेमंडळी निर्णय घेताना दिसत आहेत. माढा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच राष्ट्रावादीतून भाजपवासी झालेले रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे हे आज राष्ट्रवादी काँग्रसेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे एकेकाळी हे दोन्ही पवारांचे शिष्य आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर  मावळमधून पार्थ पवार लढणार असल्याने एकाच घरातील ३ उमेदवार नको म्हणत तरुणांना संधी देणार असल्याचे सांगत पवारांनी माढ्यातून माघार घेतली. त्यानंतर माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील लढणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मागितली होती. मात्र, माढा मतदारसंघातील आमदारांचा रणजितसिंहांच्या नावाला विरोध होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या दोन याद्या जाहीर होऊनही मोहिते पाटीय यांचे नाव त्यामध्ये नव्हते. अखेर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले.

भाजपकडून रणजितसिंह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही ऐकेकाळी पवारांचे निष्ठावाण शिष्य होते. मात्र, आता एक दूर गेला आहे तर दुसरा दूर जाऊन पुन्हा जवळ आला आहे. त्यामुळे माढ्याची लढत रंगतदार होणार हे मात्र निश्चित.

कोण आहेत संजय मामा शिंदे

संजय मामा शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे ते बंधू आहेत.

विठ्ठल शुगर म्हैसगावचे ते चेअरमन आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक आहेत.

माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापती आहेत.

२०१४ ला संजय शिंदेंनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये अगदी थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

Conclusion:
Last Updated : Mar 22, 2019, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.