ETV Bharat / state

आमदार शहाजीबापू पाटलांच्या पाठपुराव्याला यश, सांगोल्याला नीरा उजवा कालव्याचे पाणी मिळाले - सांगोला न्यूज

आमदार शहाजीबापू पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, सांगोला तालुक्याला नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तनाचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळाले आहे.

Sangola taluka got water from Nira Ujwa canal
सांगोल्याला नीरा उजवा कालव्याचे पाणी मिळाले
author img

By

Published : Jun 6, 2020, 9:52 PM IST

सोलापूर - निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पिके व फळबागांना जीवनदान देण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज पाटबंधारे कार्यालयाकडे सादर केले होते. यावर निरा उजवा कालव्याचे पाणी तातडीने सोडण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, सांगोला तालुक्याला नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तनाचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळाले आहे.

निरा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन 23 मे पासून सुरू आहे. यंदा प्रथमच उन्हाळी आवर्तनाचे पाणी 4 जून रोजी टेलपर्यंत पोहोचवण्यात यश मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे लाभक्षेत्रातील शेतीचे सर्व सिंचन पूर्ण होईपर्यंत, निरा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरूच राहणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Sangola taluka got water from Nira Ujwa canal
सांगोल्याला नीरा उजवा कालव्याचे पाणी मिळाले

निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पिके व फळबागांना जीवनदान देण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज पाटबंधारे कार्यालयाकडे सादर केले होते. यावर निरा उजवा कालव्याचे पाणी तातडीने सोडण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, सांगोला तालुक्याला नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तनाचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळाले आहे. प्रथमच निरेचे टेलपर्यंत पाणी पोहोचवण्यात यश मिळाले असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

सांगोला शाखा क्रमांक 4 ला 16 मे पासून तर शाखा क्रमांक पाच ला 23 मे पासून पूर्ण क्षमतेने पाणी सुरू आहे. डी 1, डी 2, डी 3, धायटी मायनर, 95 (3) महिम, महूद, महूद फाटा क्र.52, 67, 68, 69, 70, या सर्व वितरिकांवरील सर्व शेतकऱ्यांना पाणी देऊन सांगोला शाखा क्रमांक 4 व 5 ला उन्हाळी आवर्तनाचे पाणी सुरू आहे. 4 जून रोजीच निरेचे पाणी सांगोला शाखा क्र 5 च्या 74 किमी म्हणजे टेलपर्यंत पोहोचले आहे.

सध्या सांगोला शाखा क्र.5 ला निरा उजवा कालव्याचे पाणी पूर्ण क्षमतेने सुरू आहे. तसेच पुढील आवर्तनात चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. पहिल्यांदाच निरेचे पाणी उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत देण्यात यश आल्याने निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्ती केल्याचे समाधान मिळत असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

उन्हाळी आवर्तनाचे पहिल्यांदाच मिळाले पाणी...
सांगोला तालुक्याला नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तनाचे पाणी पहिल्यांदाच मिळाले आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निरेचे पाणी टेलपर्यंत मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने पाणी मिळाल्याने मागणीप्रमाणे लाभक्षेत्रातील शेतीचे सर्व सिंचन पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे शेतकरी तानाजीकाका पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.