ETV Bharat / state

सांगोल्यात नागरिकांनी घेतली हरित शपथ, पर्यावरण रक्षणाचा संकल्प - Sangola Municipal Council Latest News

वसुंधरा अर्थात पृथ्वीच्या संवर्धनास मदत व्हावी, निसर्गाचा समतोल साधला जावा यासाठी राज्यभरात सध्या माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे. सांगोला नगर परिषद देखील या अभियानामध्ये सहभागी झाली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना हरित शपथ देण्यात आली आहे.

सांगोल्यात नागरिकांनी घेतली हरित शपथ
सांगोल्यात नागरिकांनी घेतली हरित शपथ
author img

By

Published : Jan 3, 2021, 4:30 PM IST

सांगोला - वसुंधरा अर्थात पृथ्वीच्या संवर्धनास मदत व्हावी, निसर्गाचा समतोल साधला जावा यासाठी राज्यभरात सध्या माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे. सांगोला नगर परिषद देखील या अभियानामध्ये सहभागी झाली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना हरित शपथ देण्यात आली आहे. तसचे पर्यावरण रक्षणासंदर्भात देखील जनजागृती करण्यात येत आहे. अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली

यावेळी नगराध्यक्षा राणी माने, आरोग्य सभापती छाया मेटकरी, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, आरोग्य निरीक्षक संजय दौंडे, शहर समन्वयक शिवाजी सांगळे यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पर्यावरण पूरक हरित शपथ घेतली. तसेच यावेळी शहरातील विविध महिला बचतगट आणि विद्यार्थ्यांना देखील हरित शपथ देण्यात आली. यामध्ये मी माझे घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवेन, निसर्गाच्या पंचतत्वाचाचे संरक्षण व संवर्धन करेन, पर्यावरण पूरक व निसर्ग पूरक जीवनपद्धतीचा अवलंब करेल, माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभागी होईल, व पर्यावरण सप्तपदीचे पालन करेन आशा पद्धतीने ही शपथ घेण्यात आली.

नव्या वर्षाची सुरुवात कशी करावी याची एक नवीन वाट पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्याच्या या कार्यक्रमातून दिली गेली आहे. माझी वसुंधरा हे अभियान व्यापक प्रमाणावर शहरात राबविले जाणार असून, यातून सांगोला शहरास पर्यावरण संवर्धनाची एक नवीन दिशा मिळेल. कोरोनाच्या संकटाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या, लॉकडाऊनच्या काळात सर्वच ठिकाणी प्रदूषणात मोठी घट झाली होती. पूर्वी चित्रकला स्पर्धांमध्ये अनेक मुले दोन डोंगरांमधून उगवणाऱ्या सूर्याचे चित्र काढत असत. पण आता मुले हेच चित्र दोन इमारतींमधून उगवणाऱ्या सूर्याचे काढतात. ही परिस्थिती धोकादायक असून, नद्या, डोंगर, निसर्ग, पर्यावरण हे सर्व भावी पिढीसाठी जपले पाहिजे असे मत यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांंनी व्यक्त केले आहे.

पुढील 15 दिवसात शहरातील जास्तीत जास्त लोकांना पर्यावरणपूरक हरित शपथ घेऊन, माझी वसुंधरा अभियानात सहभागी होण्यास प्रोत्साहित करणार आहोत. माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, सौर ऊर्जेच्या वापर करण्यास,पाण्याची बचत करण्यास, ओल्या कचऱ्यावर घरच्या घरी प्रक्रिया करण्यास नागरिकांना प्रोत्साहन देणे, या सर्व गोष्टींवर भर दिला जाणार असल्याचे नगराध्यक्षा राणी माने यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.