ETV Bharat / state

इंधन दरवाढ विरोधात संभाजी ब्रिगेडचे पेट्रोल पंपावर 'बोंबाबोंब' आंदोलन

इंधन दरवाढीच्या माध्यमातून लूट करून देश चालवण्याचे तंत्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने चालविले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने आसरा चौकातील चडचणकर पेट्रोल पंपावर संभाजी श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

Sambhaji Brigade agitation against fuel price hike in solapur
इंधन दरवाढच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे पेट्रोल पंपावर बोंबाबोंब आंदोलन
author img

By

Published : Jan 23, 2021, 6:32 AM IST

सोलापूर - लॉकडाउनच्या काळात जून महिन्यापासून आजतागायत वीसहून अधिकवेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाल्यामुळे पेट्रोलच्या किमती ९१ ते ९३ रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर लवकरच पेट्रोल दराची 'सेंच्युरी' आणि वाहनधारकांची 'शंभरी' भरेल. इंधन दरवाढीविरोधात शहरातील मुख्य चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर बोंबाबोंब करून इंधन दरवाढीचा निषेध केला.

इंधन दरवाढीतुन जनतेची लूट-
इंधन दरवाढीच्या माध्यमातून लूट करून देश चालवण्याचे तंत्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने चालविले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेड सोलापूरच्यावतीने आसरा चौकातील चडचणकर पेट्रोल पंपावर संभाजी श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

श्याम कदम बोलताना...
दरवाढीचा सर्वाधिक त्रास गृहिणींना -
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ केली आहे. दरवाढीचा सर्वाधिक त्रास गृहिणींना होत आहे. भारतीय महिलांचे किचनमधील बजेट कोलमडले आहे. दिवसेंदिवस वाढणारे हे भाव कमी झालेच पाहिजे, अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडच्या अमिता जगदाळे यांनी केली.

हेच का अच्छे दिन-
अच्छे दिन ते नेमके हेच आहेत का आहेत? दरवाढीमुळे सर्वच वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. रोजंदारीवर ज्यांचे घर चालते त्यांनी गॅस विकत घ्यायचा कसा ? असा प्रश्न लोकांना पडला आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचा निषेध केला. केंद्र शासनाने सर्व इंधनांवरील दरवाढ मागे घ्यावी, गॅसवरील अनुदान तातडीने सुरू करावे अश्या मागण्या संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने करण्यात आल्या.

या आंदोलनात कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते-
यावेळी आंदोलनात संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सीताराम बाबर, उपशहर प्रमुख आशुतोष माने, सचिव सनी पटू, संघटक सुलेमान पीरजादे, अविनाश घोडके, मुश्ताक शेख, बसवराज आलगे, जिल्हा कार्याध्यक्ष अमिता जगदाळे, प्रियांका शेळके, शंकर पडसलगी, रेहान नाईकवाडी, इलियास शेख, संजय भोसले, विकास सावंत, वैष्णव कोलते, अक्षय जाधव, हर्षवर्धन शेषेराव,आदित्य पवार आदींची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.