ETV Bharat / state

आषाढी वारी 2020 : विठ्ठल भेटीनंतर तुकोबा-ज्ञानोबांच्या पालख्या परतीच्या मार्गावर

आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून पंढरपुरात आलेल्या अनेक संतांच्या मानाच्या पालख्या पौर्णिमेच्या दिवशी आपापल्या गावी जाण्यासाठी प्रस्थान करतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच द्वादशीच्या दिवशीच पालख्यांनी पंढरीचा निरोप घेतला आहे.

Saint Dnyaneshwar Maharaj and Tukaram Maharaj Paduka meet Vitthal Pandharpur solapur
संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पादूका विठ्ठल भेट
author img

By

Published : Jul 2, 2020, 9:02 PM IST

पंढरपुर (सोलापूर) : आज (गुरुवार ता. 2 जुलै) द्वादशी दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांबरोबरच मानाच्या विविध संतांच्या पादूका विठूरायाच्या भेटीसाठी मंदिरात आल्या होत्या. विठ्ठल भेटीनंतर या पादूका-पालख्या त्यांच्या गावी रवाना झाल्या आहेत.

आषाढी एकादशी सोहळ्यासाठी सर्व सूचनांचे पालन आज द्वादशीच्या दिवशी नऊ मानाच्या पादुकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे पादुकांसह दिंडीतील सर्व 20 भाविकांना विठुरायाचे दर्शन मिळाले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पादूका विठ्ठल भेट

हेही वाचा - 'तू जयांचा बाप आहे त्या पोरांना काय चिंता'

मंगळवारीच आषाढी एकादशी दिवशी सर्व पालख्यांनी विठ्ठल मंदीराला प्रदक्षिणा घातली होती. बुधवारी सकाळी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे चंद्रभागेत स्नान झाले. त्यानंतर आज विठू नामाचा जप करत पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश केला. श्री विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

आज श्री विठ्ठल दर्शनासाठी मानाच्या नऊ पालख्यांमधील प्रत्येकी 5 भाविकांनाच मंदिरात प्रवेश मिळणार होता. परंतु, जर पादुकांसह 20 वारकाऱ्यांना विठुरायाचे दर्शन घेऊ दिले नाही, तर विठ्ठल भेट न घेता माघारी जाण्याचा इशारा पालखी प्रमुखांनी दिला होता. त्यानंतर मंगळवारी मंदिर समितीने पादुकांसह सर्व 20 वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यास सहमती दर्शवली होती.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : चक्क शेणाच्या चपला, कोल्हापुरी चपलांची आणखी एक नवी ओळख

आषाढी यात्रेसाठी शासनाने दिल्या सर्व नियमांचे पालन करून सर्व पालख्या 31 जुलै रोजी पंढरीत दाखल झाल्या होत्या. राज्याच्या विविध भागातून पंढरपुरात आलेल्या अनेक संतांच्या मानाच्या पालख्या पौर्णिमेच्या दिवशी आपापल्या गावी जाण्यासाठी प्रस्थान करतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच द्वादशीच्या दिवशीच पालख्यांनी पंढरीचा निरोप घेतला आहे. आज विठ्ठल भेटीनंतर मानाच्या नऊ पादूका-पालख्यांनी लालपरीने आपल्या गावाकडे प्रस्थान केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.