पंढरपूर: सध्या महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने सुरू आहे. (navratri in maharashtra). नवरात्र निमित्त देवीची वेग-वेगळी रूपे भक्तांना पहावयास मिळत आहेत. नवरात्र निमित्त अनेक मंदिरामध्ये तुळजाभवानीच्या मातेचा गजर सुरू आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे. (navratri in pandharpur). याच पार्श्वभूमीवर सातव्या माळेच्या दिवशी मंदिरातील रुक्मिणी मातेस महालक्ष्मीच्या रुपात सजविण्यात आले आहे. (rukmini mata dress like mahalakshmi). रुक्मिणी मातेला मोरपंखी रंगाची पैठणी महालक्ष्मीच्या पद्धतीने नेसवण्यात आली होती. तसेच पोषाखावर पारंपारिक ठेवणीतील मौल्यवान हिरेजडीत दागिने घालण्यात आले होते.
विठ्ठलास पारंपरिक दागिन्यांचा साज: मंदिरातील विठूरायाला सुद्धा ठेवणीतील पारंपारिक दागिन्याने नटवण्यात आले आहे. नवरात्र निमित्त करण्यात आलेल्या या पोशाखांमुळे सावळ्या विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे मनमोहक रूप अधिकच खुलून दिसत आहे. तसेच परिवार देवता मधील श्री सत्यभामा माता, श्री राधीका माता श्री अंबाबाई, श्री लखुबाई श्री महालक्ष्मी माता व श्री व्यंकटेश ह्यांना देखील पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहेत. महालक्ष्मी रूपात सजवण्यात आलेल्या रुक्मिणी मातीचे मनमोहक रूप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी झाली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस रुक्मिणी मातेला रोज वेगळ्या अवताराचा पोशाख करण्यात येत असतो.