ETV Bharat / state

भालके की परिचारक; कोण होणार पंढरीचा राजकीय संत?

author img

By

Published : Oct 16, 2019, 6:40 PM IST

पंढरपूर मतदारसंघातून ४ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडून भारत भालके, युतीमधील भाजप मित्र पक्ष रयतक्रांती शेतकरी संघटनेकडून सुधाकर परिचारक, काँग्रेसकडून शिवाजीराव काळुंगे, तर मंगळवेढ्यातून समाधान अवताडे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही चौरंगी लढत अत्यंत रंगतदार होणार आहे. असे असले तरी पंढरपूरचा हा सामना प्रामुख्याने भालके आणि परिचारक यांच्यातच रंगणार आहे. मात्र यात आघाडीची बिघाडी हा चर्चेचा विषय ठरला आहे.

पंढरपूर मतदारसंघ

सोलापूर - पंढपूर-मंगळवेढा हा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. ऊस पट्ट्यातील या मतदारसंघावर आजपर्यंत आघाडीचेच वर्चस्व राहिले आहे. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व पूर्वाश्रमीचे काँग्रसचे आमदार भारत भालके हे करत आहेत. या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झालेले भालके आता राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील हा एकमेव मतदारसंघ असा आहे, जिथे आघाडीतील बिघाडी कायम राहिली आहे. या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीने दोघांनी आपआपले उमेदवार उभे केले आहेत.

पंढरपूर मतदारसंघातून ४ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडून भारत भालके, युतीमधील भाजप मित्र पक्ष रयतक्रांती शेतकरी संघटनेकडून सुधाकर परिचारक, काँग्रेसकडून शिवाजीराव काळुंगे, तर मंगळवेढ्यातून समाधान आवताडे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही चौरंगी लढत अत्यंत रंगतदार होणार आहे, असे असले तरी पंढरपूरचा हा सामना प्रामुख्याने भालके आणि परिचारक यांच्यातच रंगणार आहे. मात्र यात आघाडीची बिघाडी हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हॅट्ट्रीकसाठी सज्ज झालेल्या भालकेंना ही निवडणूक यावेळी जड जाणार आहे. भविष्यातील निवडणुकीतील अडचणी लक्षात घेत त्यांनी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना परिचारक गटाच्या विरोधामुळे भाजपची पायरी चढता आली नाही. त्यानंतर त्यांनी ऐनवेळी मुत्सदी राजकारण करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. मात्र, आता या मतदारसंघात आघाडीतील बिघाडीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव काळुंगे यांनी देखील उमेदवारी अर्ज कायम ठेवत भालकेंना आव्हान दिले आहे.

याचा परिणाम सोलापूर मध्य मतदारसंघात दिसून आला होता. भालके विरोधात उमेदवार दिल्याने राष्ट्रवादीने प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जुबेर बागवान यांना उमेदवारी दिली होती. मात्र, पुढे बागवान यांनी अर्ज काढून घेत माघार घेतली.

परिचारकांचे पारडे जड ?

दुसरीकडे भालकेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यांची राजकारणातील संत म्हणून ओळख आहे ते सुधाकर परिचारक यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. यापूर्वी त्यांनी २० वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेले परिचारक यांनी अर्बन बँक, साखर कारखाने, शिक्षण संस्था या माध्यमातून आपला जनाधार कायम ठेवला आहे. त्यांच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी अनेकांचा पाठिंबा मिळवला आहे. मंगळवेढ्यातल्या काही स्थानिक नेत्यांनाही आपलेसे करून घेण्यात त्यांना यश आले आहे. प्रचारात भाजपने ताकद पणाला लावली असल्याने परिचारक यांची बाजू भक्कम झाली आहे. तसेच २००९ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबही भालके यांच्या विरोधात आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. तर कल्याणराव काळे गटाचेही बळ परिचारकांना मिळाले आहे. याशिवाय २००४ च्या निवडणुकीतही परिचारकांनी भालकेंना पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती याहीवेळी होईल का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या बलस्थानांचा आणि कमकुवत बाजूंचा विचार केल्यास, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या वाटेवर असलेल्या भालकेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीची वाट धरली. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीला राजकारणातील एक कसलेला पैलवान मिळाला. राष्ट्रवादीनेही संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तसेच भालकेंचा मंगळवेढा तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे. मात्र या ठिकाणी आवताडेंच्या गटाला त्यांना शह द्यावा लागणार आहे. मतदारसंघात भालकेंनी केलेली कामे आणि बेरजेचे राजकारण यावर त्यांची भिस्त राहणार आहे.

मराठा कार्ड, आणि पवारांना मानणारा वर्ग-

मराठा आरक्षण आंदोलनावेळी भारत भालकेंनी मराठा समाजाच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला येण्यासही विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेचा यावेळी त्यांना फायदा होऊ शकतो. तसेच सध्या सकल मराठा समाजाने राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येथील जातीय समिकरणाचा विचार करता, भारत भालकेंचा हॅटट्रीकचा मार्ग थोडासा सुकर होऊ शकतो.

या शिवाय पंढरपूर मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग मोठा आहे. या ठिकाणचा बहुसंख्य मतदार हा ऊस उत्पादत शेतकरी आहे, आणि या वर्गात शरद पवारांबद्दल एक आपुलकी आहे. ते म्हणतात की, 'पंताना आमचा नमस्कार आहेच. मात्र आमचा विठ्ठल शरद पवारसाहेबचं आहेत'. पवारांनी पक्षाला गळती लागल्यानंतर महाराष्ट्र पिंजून काढत ज्या धडाडीने राष्ट्रवादीला नवसंजीवनी दिली. त्यामुळे राज्यातील तरुणाई पवारांकडे आकर्षित झाली आहे. या ठिकाणचे ज्येष्ठ मतदातेही पवारांच्या कार्याला दाद देतात, पवार साहेंबामुळेच साखर कारखानदारी वाढली आणि शेतकऱ्यांना सुखाचे दिवस आल्याची भावना येथील शेतकरी वर्गामध्ये आहे. त्यामुळे त्यांचा कल राष्ट्रवादीकडेच असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचाही फायदा भालकेंना होऊ शकतो.

समाधान आवताडेंचा फटका कोणाला बसणार-

शिवसेनेचे समाधान आवताडे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरले आहेत. मंगळवेढ्यातील दामाजी सहकारी साखर कारखाना,सूत गिरणी यासह मंगळवेढा बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद यावर समाधान आवताडे आणि त्यांचे काका बबनराव आवताडे यांचे वर्चस्व आहे. मंगळवेढा नगरपालिकेतही आवताडे गटाच्या नगरसेवकांची ताकद निर्णायक असल्याने मंगळवेढ्यात आवताडे यांची, भारत भालके आणि प्रशांत परिचारक दोघांपेक्षाही मोठी ताकद आहे. मात्र, त्यांचा पंढरपुरात म्हणावा तेवढा जनसंपर्क नाही. त्यामुळे त्यांना मंगळवेढा तालुका सोडला तर इतर ठिकाणातून जास्त मतदान होणार नाही. मात्र, आवताडेंना मिळणाऱ्या मतांच्या विभागणीचा फटकादेखील भालके गटालाच बसण्याची शक्यता आहे. कारण, मंगळवेढ्यातील भालके समर्थकांना आपल्या गोठात ओढण्यात परिचारक गटाला यश आले आहे. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांचया मते फक्त नेतेच परिचारकांच्या गळाला लागले आहेत, कार्यकर्ते नाहीत. या ठिकाणी भालकेंना दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागेल.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचा राजकीय विठ्ठल कोण? हे येत्या काळात जनताच ठरवणार आहे. मग यात राजकारणातील संत परिचारक पंढरीचे सेवा करणारे पुंडलिक होणार की, जनतेसाठी राजकीय विठ्ठल असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजकीय पैलवान भारत भालके मैदान मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:

भालके की परिचारक; कोण होणार पंढरीचा राजकीय पुंडलिक?   

सोलापूर - पंढपूर-मंगळवेढा हा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. ऊस पट्ट्यातील या मतदारसंघावर आजपर्यंत आघाडीचेच वर्चस्व राहिले आहे. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व पूर्वाश्रमीचे काँग्रसचे आमदार भारत भालके हे करत आहेत. या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रूीक करण्यासाठी सज्ज झालेले भालके आता राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. मात्र महाराष्ट्रातील हा एकमेव मतदारसंघ असा आहे, जिथे आघाडीतील बिघाडी कायम राहिली आहे. या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीने दोघांनी आपआपले उमेदवार उभे केले आहेत. 

पंढरपूर मतदारसंघातून ४ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडून भारत भालके, युतीमधील भाजप मित्र पक्ष रयतक्रांती शेतकरी संघटनेकडून सुधाकर परिचारक, काँग्रेसकडून शिवाजीराव काळुंगे, तर मंगळवेढ्यातून समाधान अवताडे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही चौरंगी लढत अत्यंत रंगतदार होणार आहे. असे असले तरी पंढरपूरचा हा सामना प्रामुख्याने भालके आणि परिचारक यांच्यातच रंगणार आहे. मात्र यात आघाडीची बिघाडी हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हॅट्रीकसाठी सज्ज झालेल्या भालकेंना ही निवडणूक यावेळी जड जाणार आहे. भविष्यातील निवडणुकीतील  अडचणी लक्षात घेत त्यांनी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना परिचारक गटाच्या विरोधामुळे भाजपची पायरी चढता आली नाही. त्यानंतर त्यांनी ऐनवेळी मुत्सदी राजकारण करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. मात्र, आता या मतदार संघात आघाडीतील बिघाडीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव काळुंगे यांनी देखील उमेदवारी अर्ज कायम ठेवत भालकेंना आव्हान दिले आहे. 

याचा परिणाम सोलापूर मध्य मतदारसंघात दिसून आला होता. भालके विरोधात उमेदवार दिल्याने राष्ट्रवादीने प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जुबेर बागवान यांना उमेदवारी दिली होती.  मात्र, पुढे बागवान यांनी अर्ज काढून घेत माघार घेतली.

परिचारकांचे पारडे जड -

दुसरीकडे भालकेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यांची राजकारणातील संत म्हणून ओळख आहे ते सुधाकर परिचारक यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. यापूर्वी त्यांनी २० वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेले परिचारक यांनी अर्बन बँक, साखर कारखाने, शिक्षण संस्था या माध्यमातून आपला जनाधार कायम ठेवला आहे. त्यांच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी अनेकांचा पाठिंबा मिळवला आहे. मंगळवेढ्यातल्या काही स्थानिक नेत्यांनाही आपलेसे करून घेण्यात त्यांना यश आले आहे. प्रचारात भाजपने ताकद पणाला लावली असल्याने परिचारक यांची बाजू भक्कम झाली आहे. तसेच २००९ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबही भालके यांच्या विरोधात आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. तर कल्याणराव काळे गटाचेही बळ परिचारकांना मिळाले आहे. याशिवाय २००४ च्या निवडणुकीतही परिचारकांनी भालकेंना पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती याहीवेळी होईल का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या बलस्थानांचा आणि कमकुवत बाजूंचा विचार केल्यास, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या वाटेवर असलेल्या भालकेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीची वाट धरली. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीला राजकारणातील एक कसलेला पैलवान मिळाला. राष्ट्रवादीनेही संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तसेच भालकेंचा मंगळवेढा तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे. मात्र या ठिकाणी आवताडेंच्या गटाला त्यांना शह द्यावा लागणार आहे. मतदारसंघात भालकेंनी केलेली कामे आणि बेरजेचे राजकारण यावर त्यांची भिस्त राहणार आहे. 

मराठा कार्ड, आणि पवारांना मानणारा वर्ग-

मराठा आरक्षण आंदोलनावेळी भारत भालकेंनी मराठा समाजाच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला येण्यासही विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेचा यावेळी त्यांना फायदा होऊ शकतो. तसेच सध्या सकल मराठा समाजाने राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येथील जातीय समिकरणाचा विचार करता भारत भालकेंचा हॅटट्रीकचा मार्ग थोडासा सुकर होऊ शकतो.

या  शिवाय पंढरपूर मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग मोठा आहे. या ठिकाणचा बहुसंख्य मतदार हा ऊस उत्पादत शेतकरी आहे, आणि या वर्गात शरद पवारांबद्दल एक आपुलकी आहे. ते म्हणतात की पंताना आमचा नमस्कार आहेच. मात्र आमचा विठ्ठल शरद पवारसाहेबचं आहेत. पवारांनी पक्षाला गळती लागल्यानंतर महाराष्ट्र पिंजून काढत ज्या धडाडीने राष्ट्रवादीला नवसंजीवनी दिली. त्यामुळे राज्यातील तरुणाई पवारांकडे आकर्षित झाली आहे. या ठिकाणचे ज्येष्ठ मतदातेही पवारांच्या कार्याला मानतात, पवार साहेंबामुळेच साखर कारखानदारी वाढली आणि शेतकऱ्यांना सुखाचे दिवस आल्याची भावना येथील शेतकरी वर्गामध्ये आहे. त्यामुळे त्यांचा कल राष्ट्रवादीकडेच असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचाही फायदा भालकेंना होऊ शकतो.  

समाधान आवताडेंचा फटका कोणाला बसणार-

शिवसेनेचे समाधान आवताडे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरले आहेत. मंगळवेढ्यातील दामाजी सहकारी साखर कारखाना,सूत गिरणी यासह मंगळवेढा बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद यावर समाधान आवताडे आणि काका बबनराव आवताडे यांचे वर्चस्व आहे. मंगळवेढा नगरपालिकेतही आवताडे गटाच्या नगरसेवकांची ताकद निर्णायक असल्याने मंगळवेढ्यात आवताडे यांची, भारत भालके आणि प्रशांत परिचारक दोघांपेक्षाही मोठी ताकद आहे. मात्र, त्यांचा पंढरपुरात म्हणावा तेवढा जनसंपर्क नाही. त्यामुळे त्यांना मंगळवेढा तालुका सोडला तर इतर ठिकाणातून जास्त मतदान होणार नाही. मात्र, आवताडेंना मिळणाऱ्या मतांच्या विभागणीचा फटकादेखील भालके गटालाच बसण्याची शक्यता आहे. कारण, मंगळवेढ्यातील भालके समर्थकांना आपल्या गोठात ओढण्यात परिचारक गटाला यश आले आहे. परिणामी भालकेंना या तालुक्यातून मतदान कमीच होणार आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचा राजकीय विठ्ठल कोण? हे येत्या काळात जनताच ठरवणार आहे. मग यात राजकारणातील संत परिचारक पंढरीचे सेवा करणारे पुंडलिक होणार की, जनतेसाठी राजकीय विठ्ठल असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजकीय पैलवान भारत भालके मैदान मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.