ETV Bharat / state

सोलापूर मतदारसंघ : जातीय मतविभाजनाच्या टर्निंग पॉईंटवर ठरणार तिरंगी लढतीचं भवितव्य...

सोलापूर मतदारसंघ : जातीय मतविभाजनाच्या टर्निंग पॉईंटवर ठरणार तिरंगी लढतीचं भवितव्य...भाजपसाठी लिंगायत लॉबिंग आणि वंचित आघाडीसाठी दलित ऐक्यामुळे मुस्लिम-मराठा आणि अन्य काँग्रेसकडे झुकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत साम, दाम, दंड आणि जातीय समीकरणावर आधारित भेद नीतीला कधी नव्हे ते महत्व आले आहे.

सोलापूर मतदारसंघ
author img

By

Published : Apr 3, 2019, 8:11 AM IST

Updated : Apr 3, 2019, 11:46 AM IST

सोलापूर - महाराष्ट्रातला एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. पूर्वी हा मतदारसंघ सर्वसाधारण असतानादेखील दिल्लीत मागासवर्गीय नेता अशी ओळख असणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूरकरांनी जातीय तराजूत न तोलता सर्वसाधारण जागेवर खासदार म्हणून निवडून दिले होते. सर्वधर्म समभावाचा एक आदर्श घालून दिला होता. पण २००९ पासून हा मतदारसंघ राखीव झाल्यावर मात्र दलित-सवर्ण ही रेषा गडद होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.

सोलापूर मतदारसंघातील जातीय समीकरणे

२०१९ मध्ये तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीला सरळ सरळ जातीचा रंग मिळाला आहे. त्यामुळे कोणती जात कुणासोबत जाणार यावरच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निकाल अवलंबून राहणार आहे.

या मतदारसंघात काँग्रेसकडून गत पराभवानंतर सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसकडून, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी भाजपकडून तर अॅड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

मोदी लाट ओसरली असं समजून शिंदे यांनी २ महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढला. त्यांच्या नेहमीच्या पध्दतीनुसार सर्वच घटकांना सोबत घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. तर डॉ.जयसिद्धेश्वर यांनी संपूर्ण भिस्त पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर टाकून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर आणि मंगळवेढा येथील लिंगायत मते गृहीत धरून निवडणुकीत उडी घेतली आहे. शिवाय मोदी आणि भाजपच्या मतांकडे बोनस म्हणून पाहिले जाते आहे.

अकोल्यात काँग्रेसने हिदायत पटेलांना उमेदवारी दिल्याने चिडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अॅड. प्रकाश आंबेडकरांनी ऐनवेळी सोलापूरात फॉर्म भरत दलित मतांची गोळाबेरीज केली. आंबेडकरी चळवळीतल्या सर्व संघटनांचे नेते आणि पक्षनेते सर्व मतभेद विसरून आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे कोण निवडून येईल हे आताच सांगणं कठीण आहे.

या मतदारसंघात जवळपास १८ लाख मतदार असून त्यापैकी अंदाजे जातनिहाय मतदार असे..

  • सर्व मागासवर्गीय मिळून ४.२५ लाख
  • मराठा ३.५० लाख
  • लिंगायत ३.२५ लाख
  • मुस्लिम ३ लाख
  • धनगर २.२५ लाख
  • तेलगुभाषिक २.२५ लाख
  • भटके विमुक्त १ लाख
  • ब्राह्मण ५० हजार
  • ख्रिश्चन १० हजार

1) यात दलितांमध्ये तेलगुभाषिक आणि मराठी भाषिक अशी विभागणी आहे.त्यामुळं दलित मतांचा आकडा मोठा असला तरी त्यांच्यांतर्गत विखुरलेपण आहे.

2) मराठा आरक्षणामुळं हा मतदार अपवाद वगळता भाजपच्या विरोधात जाईल असं राजकीय जाणकारांना वाटतंय.

3) लिंगायत काँग्रेस नेत्यांचं प्राबल्य वगळता लिंगायत भाजपसोबत जाईल असा अंदाज आहे.शिवाय मोदी प्रभाव असणारा हा मतदार आहे.

4) २०१४ ला एमआयएमसोबत गेलेला मुस्लिम मतदार अपवाद वगळता काँग्रेसला साथ देईल असे चित्र आहे. तो वंचित बहुजन आघाडी सोबत किती जाणार का याचा अंदाज अजून कोणाला आलेला नाही.

5) धनगर समाजात मान्यता असलेला नेता गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीत गेल्याने भाजप आणि काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे.धनगर कुणाकडे झुकणार यावरही मतदारसंघात विजयाचं गणित ठरत आहे.

6) ब्राह्मण आणि तेलगू भाषिकांतले सवर्ण मतदार हे हिंदुत्ववादी असून ते भाजपसोबत जातील असा कयास आहे.पण मागासवर्ग मात्र काँग्रेस सोबत राहील असा अंदाज आहे.

7) भटके आणि ख्रिश्चन हे सोयीने मतदान करतील असे अडाखे लावले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपसाठी लिंगायत लॉबिंग आणि वंचित आघाडीसाठी दलित ऐक्यामुळे मुस्लिम-मराठा आणि अन्य काँग्रेसकडे झुकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत साम, दाम, दंड आणि जातीय समीकरणावर आधारित भेद नीतीला कधी नव्हे ते महत्व आले आहे.

Intro:Body:

अकोल्यात काँग्रेसने हिदायत पटेलांना उमेदवारी दिल्याने चिडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अॅड. प्रकाश आंबेडकरांनी ऐनवेळी सोलापूरात फॉर्म भरत दलित मतांची गोळाबेरीज केली. आंबेडकरी चळवळीतल्या सर्व संघटनांचे नेते आणि पक्षनेते सर्व मतभेद विसरून आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिलेआहेत. त्यामुळे कोण निवडून येईल हे आताच सांगणं कठीण आहे.

या मतदारसंघात जवळपास १८ लाख मतदार असून त्यापैकी अंदाजे जातनिहाय मतदार असे..

सर्व मागासवर्गीय मिळून ४.२५ लाख

मराठा ३.५० लाख

लिंगायत ३.२५ लाख

मुस्लिम ३ लाख

धनगर २.२५ लाख

तेलगुभाषिक २.२५ लाख

भटके विमुक्त १ लाख

ब्राह्मण ५० हजार

ख्रिश्चन १० हजार

1) यात दलितांमध्ये तेलगुभाषिक आणि मराठी भाषिक अशी विभागणी आहे.त्यामुळं दलित मतांचा आकडा मोठा असला तरी त्यांच्यांतर्गत विखुरलेपण आहे.

2) मराठा आरक्षणामुळं हा मतदार अपवाद वगळता भाजपच्या विरोधात जाईल असं राजकीय जाणकारांना वाटतंय.

3) लिंगायत काँग्रेस नेत्यांचं प्राबल्य वगळता लिंगायत भाजपसोबत जाईल असा अंदाज आहे.शिवाय मोदी प्रभाव असणारा हा मतदार आहे.

4) २०१४ ला एमआयएमसोबत गेलेला मुस्लिम मतदार अपवाद वगळता काँग्रेसला साथ देईल असे चित्र आहे. तो वंचित बहुजन आघाडी सोबत किती जाणार का याचा अंदाज अजून कोणाला आलेला नाही.

5) धनगर समाजात मान्यता असलेला नेता गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीत गेल्याने भाजप आणि काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे.धनगर कुणाकडे झुकणार यावरही मतदारसंघात विजयाचं गणित ठरत आहे.

6) ब्राह्मण आणि तेलगू भाषिकांतले सवर्ण मतदार हे हिंदुत्ववादी असून ते भाजपसोबत जातील असा कयास आहे.पण मागासवर्ग मात्र काँग्रेस सोबत राहील असा अंदाज आहे.

7) भटके आणि ख्रिश्चन हे सोयीने मतदान करतील असे अडाखे लावले जात आहेत.

या  पार्श्वभूमीवर भाजपसाठी लिंगायत लॉबिंग आणि वंचित आघाडीसाठी दलित ऐक्यामुळे मुस्लिम-मराठा आणि अन्य काँग्रेसकडे झुकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत साम, दाम, दंड आणि जातीय समीकरणावर आधारित भेद नीतीला कधी नव्हे ते महत्व आले आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 3, 2019, 11:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.