ETV Bharat / state

आमदार शिंदेंचा पत्ता होणार कट? माढ्यात राष्ट्रवादीचा नवा 'शिलेदार' कोण? - माढा विधानसभा मतदारसंघ

माढा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी महत्वाचा आहे. कारण गेल्या २५ वर्षापासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे आमदार बबनरावजी शिंदे यांची एकहाती सत्ता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आमदार शिंदे हे राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे चित्र दिसत आहे. ते सध्या लवकरच भाजपवासी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या मतदारसंघातून अनेकजण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

माढा विधानसभा
author img

By

Published : Sep 22, 2019, 1:13 PM IST

Updated : Sep 22, 2019, 3:39 PM IST

सोलापूर - सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. जिल्ह्यातील अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. त्यातच जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी महत्वाचा आहे. कारण गेल्या २५ वर्षापासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे आमदार बबनरावजी शिंदे यांची एकहाती सत्ता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आमदार शिंदे हे राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे चित्र दिसत आहे. ते सध्या लवकरच भाजपवासी होणार असल्याची अद्यापही चर्चा सुरु आहे.

आमदार बबनदादा शिंदे शरद पवारांचे एकनिष्ठ सहकारी मानले जात होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे पेव फुटले असताना, शिंदेही पक्षांतरांच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सहकार, कारखानदारी, बँका यामाध्यमातून आमदार शिंदेनी तालुक्यात कार्यकर्त्यांच जाळ निर्माण केले आहे. जर शिंदे राष्ट्रवादीकडून लढले नाहीत तर राष्ट्रवादीचा नवा शिलेदार कोण असणार याची जोरदार चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. तसेच लोकसभेला माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे हेही भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. तर यावेळी शिंदे बंधूना आमदारकीपासून रोखयचच यासाठी युतीने जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचीही माहिती मिळते आहे.

हेही वाचा - शिवसेना पैसे घेवून मंत्री, आमदार बनवते; नारायण राणेंचा गंभीर आरोप

हेही वाचा - विखे पाटलांचे जावई माने-देशमुख विधानसभेसाठी 'या' मतदारसंघातून इच्छूक

शिंदेंच्या विरोधकांची मोर्चेबांधणी
आमदार शिंदेंच्या विरोधात यावेळी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यावेळी आमदार शिंदेच्या विरोधात समविचारी एकच उमेदवार द्यायचा, असे ठरवले आहे. शिंदे जर भाजपमध्ये गेले तर येथून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हादेखील चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे शिंदेंच्या विरोधात यावेळी कोण निवडणूक लढवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

युतीत शिवसेनेच्या वाट्याला माढ्याची जागा
भाजप शिनसेना युती झाली तर ही जागा शिवसेनेच्या कोट्यात आहे. त्यामुळे शिंदे जर भाजपमध्ये गेले आणि भाजप सेना युती झाली तर तिकीट द्यायचे कोणाला हा प्रश्न युतीमध्ये निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या युतीचा काय निर्णय होतो यावरच आमदार शिंदेचा निर्णय आवलंबून असल्याचे बालले जात आहे.

इच्चुकांची गर्दी
माढा विधानसभेसाठी अनेकजण इच्छुक असल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये विदयमान आमदार बबनदादा शिंदे, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले पंढरपूरचे कल्याणराव काळे, शिवसेनेचे प्रा. शिवाजीराव सावंत, संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे, रयत क्रांती संघटनेचे प्रा. सुहास पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर हे माढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. मात्र, आता विधानसभेला कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकिट मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आता यामधून कोण माढा विधानसभेचे मैदान मारणार हा येणारा काळच ठरवणार आहे.

2 दिवसात निर्णय घेणार - आमदार शिंदे
विधानसेभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात निर्णय घेणार आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आम्ही पुढची वाटचाल करणार असल्याचे आमदार बबनदादा शिंदे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. शिंदे भाजपच्या वाट्यावर असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात चालू आहे.

जागा शिवसेनेलाच सुटणार - शिवाजीराव सावंत
सुरुवातीपासूनच युतीमध्ये माढ्याची जागा ही शिवसेनेकडे आहे. त्यामुळे यावेळीसुद्धा ही जागा शिवसेनेलाच सुटणार असल्याची माहिती प्रा. शिवाजी सावंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल असेही सावंत म्हणाले.

चांगला पर्याय आल्यास विचार करणार - दादासाहेब साठे
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे हेही भाजपकडून माढा विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनीही पक्षाकडे मागणी उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाने उमेदवारी दिली नाही आणि माझ्यासमोर चांगला पर्याय उपलब्ध होत असेल तर विचार करणार असल्याचे साठे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. आमदार शिंदे भाजपमध्ये आल्यास त्यांचे काम करणार का? असा प्रश्न केला असता साठे म्हणाले, की आमचा आणि शिंदेंचा वैचारिक विरोध आहे. त्यासंबधीचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेऊ असेही साठे म्हणाले.

इच्छुक आहे, पण पक्षादेश महत्वाचा - कल्याणराव काळे
माढा विधानसभेसाठी मी इच्छुक आहे, मात्र भाजपचे वरिष्ठ नेते जो मला आदेश देतील तो मान्य असेल असल्याचे वक्तव्य कल्याणराव काळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले. आमदार शिंदे जर भाजपमधये आले तर त्यांचे काम करणार का? असा प्रश्न केला असता काळे म्हणाले, की पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल. मात्र, आमदार बबनदादा शिंदेंना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल असे मला वाटत नसल्याचे काळे म्हणाले.

पवारसाहेब जो आदेश देतील तो मान्य - राजूबापू पाटील
शरद पवारसाहेब जो आदेश देतील तो मान्य मला मान्य असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजूबापू पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले. मी इच्छुक आहे. मात्र, आमदार बबनदादा शिंदे यांचा अद्याप काहीही निर्णय झाला नाही. त्यांची जरी भाजप प्रवेशाची चर्चा असली तरी ते राष्ट्रवादीमध्येच आहेत. त्यामुळे पवारसाहेब सांगतील तेच मी करणार असल्याचे पाटील म्हणाले.

२५ वर्ष ज्यांच्याकडे सत्ता, त्यांनी काहीच केले नाही - दिनेश जगदाळे
दिनेश जगदाळे हेदेखील संभाजी ब्रिगेडकडून निवडणूक लढवार आहेत. त्यांची उमेदवारीही फिक्स झाली असल्याची माहिती जगदाळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. २५ वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी माढा तालुक्याचा काहीही विकास केला नसल्याचे जगदाळे म्हणाले. गेल्या २५ वर्षात सांगण्यासारखे तालुक्यात एकही शहर झाले नाही. शिक्षण, आरोग्याच्या मोठ्या गैरसोई तालुक्यात असल्याचे जगदाळे म्हणाले. येणाऱ्या काळात या प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम करणार असल्याचे जगदाळे म्हणाले.

रयत क्रांतीसाठी माढ्याची जागा सोडावी - प्रा. सुहास पाटील
भाजपचा मित्रपक्ष असेलेली रयत क्रांती संघटना माढा विधानसभेसाठी आग्रही आहे. येथून रयत क्रांती संघटनेचे नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रा. सुहास पाटील हे इच्छुक आहेत. पक्षाची मतदारसंघात चांगली ताकद आहे. त्यामुळे आमच्या पक्षाला येथून भाजपने जागा सोडावी असे पाटील ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले.

संजय पाटील-घाटणेकर
बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील घाटणेकर हेसुद्धा माढा विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळते आहे. नुकतीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही भेट घेतली असून, राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितल्याची माहिती मिळते आहे.

माढा विधानसभेसभेच्या पार्श्वभूमीवर धौर्यशील मोहिते पाटील यांच्याशीही संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले, की माढा विधानसभेची जागा ही युतीत शिवसेनेकडे आहे. त्यामुळे येथून मी इच्छुक नाही. भाजपचे श्रेष्ठी जो निर्णय देतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार असल्याचे माहिते पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

२०१४ ची परिस्थिती
बबनराव शिंदे, राष्ट्रवादी (विजयी) -९७,८०३
कल्याणराव काळे (काँग्रेस) - ६२,०२५

शनिवारपासून आचारसहिंता लागू झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने जर शिंदेचा पत्ता कट केला तर येथून राष्ट्रवादीचा नवा चेहरा कोण असेल? शिंदे भाजपमध्ये गेले तर भाजप त्यांना तिकिट देईल काय? सावंत बंधुची भूमिका काय असणार असे असंख्य प्रश्न निर्माण होत आहे. हे सर्व चित्र येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल. मात्र, विरोधक शिंदेच्या वर्चस्वाला धक्का देतील का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे.

Intro:Body:

newsss

Conclusion:
Last Updated : Sep 22, 2019, 3:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.