सोलापूर - करमाळा तालुक्यातील आवाटी येथील 'हजरत वली चांद पाशा' यांच्या दर्ग्यामध्ये बुधवार, दि. 3 जून रोजी हजरत शेख शरफुदीन बुअली शाह कलंदर रह पानिपती यांचा धार्मिक कार्यक्रम कोरोनाच्या संसर्गामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याची माहिती दर्गा विश्वसत मंडळाने दिली
आवाटी येथील 'हजरत वली चांद पाशा दर्गा'मध्ये दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. हा दर्गा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून या ठिकाणी अनेक भक्तगण येऊन आपल्या इच्छा मांडतात.
याबाबत विश्वसत मंडळाने सांगितले की, सध्या कोरोना विषाणुमुळे महाराष्ट्रात कमालीचे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे भक्तांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या हेतूने व कोरोना बचाव मोहिमेमुळे 3 जून रोजी 'बु अली शाह कलंदर पानिपती रहमानी' यांच्या स्मरणार्थ आवाटी येथील 'हजरत वली चांद पाशा' दर्गामध्ये करण्यात येणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.