सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर भाजपने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता माढा लोकसभेचा सामना राष्ट्रवादीचे संजय शिंदे विरुद्ध रणजिंतसिंह निंबाळकर यांच्यात होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून माढा लोकसभेसाठी भाजपकडून कोण उमेदवार असणार याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे.