ETV Bharat / state

विठुरायाला नैसर्गिक रंग लावून रंगपंचमी साजरी - पंढरपुरातील रंगपंचमी

रंगपंचमी यावर्षी कोरोना विषाणूच्या भीतीमुळे विठ्ठल मंदिर समितीकडून साधेपणाने साजरी करण्यात आली. मात्र, विठुरायाला नैसर्गिक रंग लावून रंगपंचमी साजरी केली. त्यानंतर डफाची पूजा विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते करण्यात आली.

पंढरपूर
author img

By

Published : Apr 2, 2021, 10:35 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरी केली जाणारी रंगपंचमी यावर्षी कोरोना विषाणूच्या भीतीमुळे विठ्ठल मंदिर समितीकडून साधेपणाने साजरी करण्यात आली. मात्र, विठुरायाला नैसर्गिक रंग लावून रंगपंचमी साजरी केली. त्यानंतर डफाची पूजा विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते करण्यात आली.

वसंत पंचमी ते रंगपंचमी दरम्यान विठ्ठलाला दररोज पांढरा पोषाख परिधान केला जातो. त्यावर गुलाल टाकून देवाची पूजा केली जाते. विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने देवाची पूजा करून अंगावर पारंपरिक रंग टाकून देवाची रंगपंचमीला साजरी करण्यात आली. देवाच्या डफाची नामदेव पायरी येथे पूजा करून या डफाची पाच जणांच्या उपस्थित प्रदक्षिणा मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. साध्या पद्धतीने रंगपंचमी विठ्ठल मंदिर साजरी झाली आहे.

विठ्ठल मंदिर समितीकडून कोरोनाबाबत दक्षता

श्री विठ्ठल मंदिर समितीकडून रोज सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन दिले जाते. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पारंपारिक पद्धतीनुसार पूजा केली जाते. मंदिर प्रशासनाकडून रोज दीड हजार भाविकांना मुखदर्शनाची सोय करून देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.