सोलापूर - महानगरपालिकेतील भाजपाचे उपमहापौर राजेश काळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. फ्लॅटविक्री फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी उपमहापौर काळे त्यांना अटक केली आहे. विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने पुणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
पुण्यातील सांगवी येथील एका फ्लॅटविक्री प्रकरणात काळे यांना अटक करण्यात आली आहे. उपमहापौरांनी पुण्यातील सांगवी येथील एकच फ्लॅट चार ते पाच जणांना विकला आणि त्यांच्याकडून पैसे घेतले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काळे यांच्या विरुद्ध सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी काळे यांच्या साथीदारांनाही आगोदरच अटक करण्यात आलेली आहे.