सोलापूर : युवराज कृष्णा भालेराव (वय 56) यांचे मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे हृदयविकाराच्या झटक्याने (eath due to heart attack ) दि.23 रोजी सकाळी निधन (PSI Yuvraj Bhalerao death) झाले. ते पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत होते.
उपचारापूर्वीच मृत्यु : याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी (PSI Yuvraj Bhalerao) की, पंढरपूर येथील संत निरंकारी मठ, सांगोला रोड येथे राहणारे तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे युवराज भालेराव हे मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे दोन दिवस मामाच्या घरी राहण्यासाठी आले होते. दरम्यान, शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी सकाळी अचानकपणे चक्कर येऊन ते खाली पडले. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोहोळ दाखल करण्यात आले. येथे मात्र डॉक्टरांनी तपासणी करून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित (PSI death due to heart attack) केले.
आकस्मित निधन : युवराज भालेराव यांच्या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त केली जात असून, पोलीस खात्याअंतर्गत नुकत्याच झालेल्या पदोन्नतीमध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या पश्चात दोन अविवाहित मुले व पत्नी असा परिवार आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन मुसळे हे करीत (PSI Yuvraj Bhalerao death due to heart attack) आहेत.