ETV Bharat / state

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 'प्रीसिजन'कडून एक कोटी - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी प्रीसिजन उद्योग समूहाकडून एक कोटी रुपयांचा मदतनिधी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे देण्यात आला. यातील 50 लाखांची रक्कम पंतप्रधान सहायता निधी व उर्वरित 50 लाखांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपुर्द करताना यतीन शहा

author img

By

Published : Apr 1, 2020, 10:22 PM IST

सोलापूर - कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी प्रीसिजन उद्योगसमूहाकडून एक कोटी रुपयांचा मदतनिधी देण्यात आला. प्रीसिजनचे अध्यक्ष यतीन शहा यांनी 1 कोटी रूपये मदतीचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सपूर्द केला आहे.

सोलापुरातील प्रीसिजन उद्योग समूहाने 1 कोटी रूपयाची मदत ही कोरोनाच्या लढ्यासाठी दिली आहे. यातील प्रत्येकी 50 लाख रुपये पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले जाणार आहेत.

प्रीसिजन उद्योग समूहाचे अध्यक्ष यतिन शहा यांनी आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रीसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, कंपनीचे संचालक तथा मुख्य वित्तीय अधिकारी रवींद्र जोशी, कार्यकारी संचालक करण शहा उपस्थित होते.

प्रीसिजन कंपनीकडून यापूर्वीही आरोग्य क्षेत्रात भरीव काम करण्यात आले आहे. सोलापुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात डायलेसिस वॉर्डनिर्मिती, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कर्णबधीरत्वाचे निदान करणारी बेरा टेस्टिंग मशीन, स्थूलपणा सर्जरीशी निगडित बॅरिऍट्रिक मशीन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

हेही वाचा - Coronavirus : सोलापूर जिल्ह्यात 66 ठिकाणी नाकाबंदी, 1 हजार 13 गुन्हे दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.