ETV Bharat / state

Praniti Shinde : भाजप आमचा एकमेव शत्रू; राज्यातील सत्तासंघर्षावर प्रणिती शिंदे यांची टीका

राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर आमदार प्रणिती शिंदे यांनी वक्तव्य केले आहे. सत्तेसाठी सर्व काही सुरू आहे. सरकारला जनतेशी काही देणेघेणे नाही अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. तसेच भाजप आमचा एकमेव शत्रू असल्याचे आमदार शिंदे म्हणाल्या.

Praniti Shinde On Shinde Gov
Praniti Shinde On Shinde Gov
author img

By

Published : Feb 21, 2023, 10:01 PM IST

भाजप आमचा एकमेव शत्रू -प्रणिती शिंदे

सोलापूर : राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर आमदार प्रणिती शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात शिंदे गट - ठाकरे गट यांच्यामध्ये सत्ता संघर्षावरून वाद सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यावर आपला मित्रपक्ष म्हणून काय प्रतिक्रिया आहे, असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांना विचारला असता, सत्तेसाठी सर्वकाही सुरू आहे. सरकारच जनतेशी काही देणे नाही. हे लोकांना कळून चुकले आहे. आमचा त्यांच्याविरुद्ध लढा असाच सुरू राहणार. बीजेपी हा आमचा एकमेव शत्रू आहे, अशी प्रतिक्रिया आ. प्रणिती शिंदे यांनी दिली आहे.

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात शिंदेच गीत : पगारवाढीसाठी अंगणवाडी सेविकांचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. सोलापूर शहर, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यावेळी सहभागी झाल्या. तसेच त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकारवर टीका केली. रॅलीदरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी गाणे गात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंगणवाडी सेविकांसोबत चटणी भाकर खाल्ली.

सरकारचा निषेध करणार : अंगणवाडी सेविका संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर आणि जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचे दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सोमवारी झालेल्या आंदोलनात काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. मंगळवारी हातात लाटणे घेऊन निषेध करण्यात आला, बुधवारी चटणी भाकर खाऊन राज्य शासनाचा विरोध करणार आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी माहिती देताना सांगितले अंगणवाडी सेविकांचा विषय विधानसभेत मांडणार आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Supari Allegation : ठाण्यात शिजली संजय राऊतांच्या हत्येची खिचडी! वाचा संपूर्ण प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.