सोलापूर - काँग्रसेच्या सोलापुरातील आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळणार असेल, तर ती आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमाकडूनच मिळालेली आहे. पक्षीय पातळीवरून प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची कोणतीही माहिती नाही. मात्र, प्रसार माध्यमातूनच अशी माहिती मिळत असल्याचेही प्रकाश वाले यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - सोलापुरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन
नव्या मंत्रिमंडळात युवा आणि अनुभवी अशा दोन्ही नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळामध्ये प्रादेशिक तसेच सामाजिक समतोल साधण्याचाही प्रयत्न केला जाईल. तत्पूर्वी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.