ETV Bharat / state

Kadu Vs Rana: प्रहार संघटनेने काढली आमदार रवी राणांची तिरडी.. बच्चू कडूंविरोधातील वक्तव्याचा निषेध - रवी राणांची तिरडी

सोलापूर येथे प्रहार संघटनेने आक्रमक आंदोलन करत आमदार रवी राणांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढली. (Prahar Organization Protest). आमदार रवी राणा (ravi rana) यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

प्रहार संघटनेने काढली रवी राणांची तिरडी
प्रहार संघटनेने काढली रवी राणांची तिरडी
author img

By

Published : Oct 28, 2022, 10:30 PM IST

सोलापूर: सोलापूर येथे प्रहार संघटनेने आक्रमक आंदोलन करत आमदार रवी राणांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढली. (Prahar Organization Protest). आमदार रवी राणा (ravi rana) यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ ही तिरडी काढण्यात आली. वेळ आली तर अमरावतीला जाऊन रवी राणांचा पुतळा दहन करू, असा इशारा प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला. सोलापूरातील इंदिरा नगर जवळील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्या शेजारी ही तिरडी यात्रा काढण्यात आली.

रवी राणांचे आक्षेपार्ह वक्तव्य: प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बचू कडू यांच्या विरोधात आमदार रवी राणा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. बच्चू कडुंनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले. ते खोके बाहेर काढा आणि गोरगरीबांना द्या, असे राणा म्हणाले होते. राणांच्या या वक्तव्यानंतर बच्चू कडू यांनी राणां विरोधात पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे माझे चारित्र्यहनन झाले आहे असा बच्चू कडूंचा आरोप आहे.

प्रहार संघटनेने काढली रवी राणांची तिरडी

अमरावतीत जाऊन रवी राणांचा पुतळा दहन करण्याचा इशारा: प्रहार संघटना व त्यांचे पदाधिकारी हे नेहमीच गोरगरिबांना मदत करत असतात. बचू कडू यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा न करता अनेक गोरगरीब अपंगांना सायकली वाटप केल्या. अशा दानशूर व्यक्ती विरोधात असे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदारला धडा शिकवण्यासाठी प्रहार संघटना अमरावतीत जाऊन त्यांचा पुतळा दहन करू. येत्या 1 नोव्हेंबर रोजी आमदार रवी राणा विरोधात राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, असे सोलापूर प्रहार संघटना शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी म्हटले आहे. आंदोलना दरम्यान प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.