ETV Bharat / state

Sambhaji Bhide : भिडे गुरुजी यांच्या धोतरात साप सोडू, प्रहार जनशक्ती पक्षाकडून संताप

संभाजी भिडे यांनी भारताच्या स्वातंत्र्यबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भिडे गुरुजींच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी प्रहारचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी संभाजी भिडे यांचा निषेध केला. तसेच संभाजी भिडे यांच्या धोतरात साप सोडू असा इशारा दिला आहे.

Sambhaji Bhide
संभाजी भिडे
author img

By

Published : Jun 27, 2023, 10:24 PM IST

माहिती देताना अजित कुलकर्णी

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. भिडे गुरुजींच्या वादग्रस्त वक्तव्याचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी सोलापुरात प्रहारच्या वतीने भिडे गुरुजी यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच भिडे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. प्रहारचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी भिडे गुरुजी यांचा निषेध केला आहे. भिडे गुरुजी यांच्या धोतरात साप सोडू असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच भिडे यांनी मेडिकल, फिजिकल तपासून घ्यावे असे देखील म्हटले आहे.

काय म्हणाले होते, संभाजी भिडे : पिंपरी येथील दिघी या ठिकाणी संभाजी भिडे यांचे व्यख्यान झाले होते. या व्याख्यानात भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्य दीनाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिन नाही, या दिवशी दुखवटा पाळा, या वादग्रस्त वक्तव्याने भिडे गुरुजीनी पुन्हा एकदा एक नवा वाद ओढावला आहे. 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिन नाही, कारण या दिवशी देशाची फाळणी झाली होती, असे ते म्हणाले होते. आता भिडे गुरुजींच्या या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध होण्यास सुरुवात झाली आहे.

भिडे गुरुजींच्या धोतरात साप सोडू : प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी व शहर संपर्क प्रमुख जमिर शेख, खालिद मणियार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सायंकाळी सोलापुरात आंदोलन झाले. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. अजित कुलकर्णी यांनी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला, भिडे गुरुजींच्या धोतरात साप सोडू असा इशारा त्यांनी दिला. जमिर शेख यांनी माध्यमांना संतप्त प्रतिक्रिया दिली. भिडे गुरुजींवर देशद्रोहाचा तसेच राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. यावेळी प्रहारचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Sambhaji Bhide : '15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिन नाही, या दिवशी दुखवटा पाळा', संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
  2. Bawankule met Bhide : चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली संभाजी भिडेंची भेट; बंद दाराआड चर्चा
  3. Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वादंग! राज्य महिला आयोगाने पाठवली नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.