ETV Bharat / state

भरधाव टेम्पोने वाहतूक पोलिसाला चिरडले, सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना

सोलापूर-पुणे महामार्गावर भरधाव टेम्पोने वाहतूक पोलिसाला धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. सागर औदुंबर चौबे (वय-35, रा. बार्शी) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. अपघातानंतर टेम्पोचालक नवनाथ गुटे याला अटक करण्यात आली आहे.

Policeman Death in accident
भरधाव टेम्पोने वाहतूक पोलिसाला चिरडले
author img

By

Published : Dec 7, 2020, 2:28 AM IST

सोलापूर- सोलापूर-पुणे महामार्गावर भरधाव टेम्पोने वाहतूक पोलिसाला धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. सागर औदुंबर चौबे (वय-35, रा. बार्शी) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. अपघातानंतर टेम्पोचालक नवनाथ गुटे याला अटक करण्यात आली आहे.

टेम्पो चालकास थांबण्याचा इशारा केला होता

हा अपघात रविवारी 4 च्या दरम्यान वरवडे टोल नाक्याजवळ घडला. हैदराबादहून मुंबईकडे औषधे घेऊन जाणाऱ्या या टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न सागर चौबे यांनी केला होता. मात्र या टेम्पोचा वेग जास्त असल्याने चालकाचे टेम्पोवरून नियंत्रण सुटले आणि अपघात घडला. या अपघातात चौबे यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर टेम्पो चालकाला अटक

दरम्यान अपघातानंतर टेम्पो चालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर टेम्भुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा टेम्पोचालक मद्यप्राशान करून वाहन चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 2007 साली मृत सागर चौबे आणि त्यांचा भाऊ विशाल चौबे हे ग्रामीण पोलीस दलामध्ये भरती झाले होते. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.