ETV Bharat / politics

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील तिन्ही राखीव मतदारसंघात बंडखोरांमुळं महायुतीला फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत होणार असून, अधिकृत उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बंडखोर उमेदवारांमुळं महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2024, 4:35 PM IST

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 राखीव मतदारसंघ आहेत. यामध्ये भिवंडी ग्रामीण आणि शहापूर हे अनुसूचित जमातीसाठी तर अंबरनाथ हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. भिवंडी ग्रामीणमधून शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे, शहापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर या तिघांनाही महायुतीनं पुन्हा रिंगणात उतरवलं आहे. मात्र, या तिन्ही मतदारसंघात भाजप बंडखोरांसह निलेश सांबरे यांच्या जिजाऊ विकास पक्षाच्या उमेदवारांमुळं आणि मनसेही मैदानात उतरल्यानं महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना फटका बसणार असल्याचं चित्र आहे.

महायुतीची डोकेदुखी वाढली : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असली, तरी मनसे आणि भाजपाच्या बंडखोर उमेदवारामुळं या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून ही जागा शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे हे लढवत आहेत, तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महादेव घाटाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या महिला नेत्या स्नेहा पाटील यांच्या बंडखोरीमुळं भाजपा कार्यकर्त्यांनी अजूनही शिवसेनेची प्रचार मोहीम हाती घेतली नाही. त्यामुळं ही बंडखोरी शांताराम मोरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण भागात मनसेनं वनिता कथोरे यांना उमेदवारी दिली असून मनसेचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ते प्रदेश उपाध्यक्ष हे भिवंडी ग्रामीण मतदारसंघात राहत असल्यानं मनसे नेत्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्यानं मनसेनेदेखील येथं जोर मारला आहे.

मतदारसंघात कायम अनेक समस्या कायम : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गोदाम पट्टा, कारखाने, स्टील कंपन्या असल्यानं अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं रस्त्यांची दुरवस्था, प्रचंड वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याची समस्या, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांचा अभाव, अवकाळी पावसानं मेटाकुटीला आलेले शेतकरी, आदिवासींच्या वनहक्क जमिनीचे प्रलंबित प्रश्न, निवारा, रस्त्यांच्या समस्या, 60 गावांतील ग्रामविकासाकडे एमएमआरडीएचं दुर्लक्ष आणि त्यामुळं वाढलेली अनधिकृत बांधकामं अशा अनेक समस्या या मतदारसंघात कायम आहेत. या समस्या सोडविण्यासाठी गेली 10 वर्ष आमदार मोरे यांनी पाठपुरावा केला नसल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रसाराचा मुद्दा केल्याचं दिसून येत आहे.

महायुती आणी महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान : शहापुर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे (शरद पवार गट ) पांडुरंग बरोरा विरोधात महायुतीचे (राष्ट्रवादी काँग्रेस) दौलत दरोडा अशी थेट लढत आहे. मात्र, जिजाऊ विकास पक्षानं अपक्ष उमेदवार म्हणून रंजना उघडा व मनसेनं हरिचंद्र खांडवी यांना उमेदवारी देऊन महायुती आणी महाविकास आघाडीला मोठं आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत जिजाऊ विकास पक्षाचे सांबरे याच विधानसभा मतदारसंघात 75 हजार मतं मिळवत भिवंडी लोकसभेत 2 लाख 35 हजार मतांचा टप्पा गाठला होता. त्यामुळं यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.

200 हून अधिक पाणी योजना, तरीही पाण्याची टंचाई : शहापूर विधानसभा मतदारसंघात आदिवासी बहुल दुर्गम विभाग आहेत. येतं आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज अशा अनेक समस्या आजही कायम आहेत. मुंबई ठाणे शहरांना पाणी पुरवठा करणारी भातसा, वैतरणा, तानसा सारखी तिनंही मोठी धरणं शहापुर तालुक्यात आहेत. परंतु धरण उशाला आणी कोरडं घशाला या युक्तीप्रमाणं आजही या धरणांच्या बाजुला आसलेल्या शेकडो वाड्या वस्त्यांवर पाण्याची भीषण टंचाई आहे. या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासूनची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या 200 हून अधिक पाणी योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, भ्रष्टाचारामुळं निम्म्याहून अधिक पाणी योजना कागदावरच राहिल्यानं काही कंत्राटदारांवर गुन्हेही दाखल झाले. मात्र, दाखल गुन्हांच्या चौकशीचं पुढं काय झालं? हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

आमदार दौलत दरोडांकडून तेच तेच आश्वासन : शहापूर शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. मात्र, आवश्यक डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळं सेवा- सुविधा असूनही योग्य उपचार मिळत नाहीत. तसंच विभागनिहाय आरोग्य केंद्रं स्थापन करण्यात आल्यानं या आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसे व तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्यामुळं आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. महिला सक्षमीकरण, कुपोषण, बालमृत्यू यांसारखे प्रश्न गेल्या अनेक वर्षात सुटलेले नाहीत. विशेषत: आमदार दौलत दरोडा या मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. मात्र, आजही आरोग्याबाबत अनेक समस्या कायम आहेत. दौलत दरोडा पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून पुन्हा तेच तेच आश्वासन देतात दिसत आहे. दरम्यान, शरदचंद्र पवार पक्षाच्या बरोरा यांनी तालुक्यातील समस्यांवर बोट ठेवत प्रचारात रंगत आणली आहे.

शिवसेना उमेदवाराच्या अडचणी वाढणार : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात आमदार बालाजी किणीकर यांना कडवी लढत द्यावी लागणार असल्याची चिन्हं आहेत. सुरुवातीला किणीकर यांना शिवसेनेतून अंतर्गत विरोध होता. त्यात खुद्द मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानं दोन्ही गट एकत्र आले. मात्र, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे मतभेद आहेत. त्यामुळं हे मतभेद दूर होऊन त्याचं मतांमध्ये रूपांतर होणार का? हा प्रश्न आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं राजेश वानखेडे यांना अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात उतरवलं आहे. मनसेनं अंबरनाथ विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेला मदत केल्यास फटका किणीकर यांना बसण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजेश वानखेडे यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं शिवसेनेचे उमेदवार बालाजी किणीकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसे ठाकरेंच्या उमेदवाराला मदत करणार : लोकसभा निवडणुकीत अंबरनाथ विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेला चांगली मतं मिळाली. कोणतीही संघटनात्मक बांधणी किंवा ताकद नसताना मिळालेली ही मतं शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे. या मतदारसंघात मनसेची ताकद लक्षणीय आहे. मनसेनं येथं उमेदवार दिला नाही. पण लोकसभेत शिवसेनेसोबत काम करणाऱ्या मनसेला स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी विश्वासात घेतलं नाही. त्यामुळं मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ठाकरेंच्या उमेदवाराला मदत करू, असं सूतोवाच केलं.

हेही वाचा

  1. भाजपाला जनतेने सत्ता दिली, मात्र त्यांनी काळा अध्याय लिहिला; अशोक गेहलोत यांची टीका
  2. मराठा आरक्षणासाठी चारच पर्याय; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मराठा महासंघाची भूमिका स्पष्ट, म्हणाले...
  3. राहुल गांधींच्या कार्यक्रमात संविधानाच्या 'कोऱ्या' प्रती? संविधानावरून रंगलं राज्याचं राजकारण, नेमकं प्रकरण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.