ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2 द रुल'ची ट्रेलर रिलीज डेट आली समोर, अल्लू अर्जुननं दिलं चाहत्यांना सरप्राईज - PUSHPA 2 THE RULE TRAILER

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 द रुल'च्या ट्रेलर रिलीजची डेट समोर आली आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होईल, याबद्दल जाणून घ्या...

Pushpa 2
पुष्पा 2 ('पुष्पा 2'ची ट्रेलर रिलीज तारीख (Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 11, 2024, 4:28 PM IST

मुंबई - साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2- द रुल'च्या रिलीजची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान अल्लू अर्जुननं त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिला आहे. आज 11 नोव्हेंबर रोजी 'पुष्पा 2' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजच्या तारखेबद्दल एक मोठी अपडेट आली आहे. 'पुष्पा 2'च्या निर्मात्यांनी आज 11 नोव्हेंबर रोजी ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. 'पुष्पा 2'च्या ट्रेलरची रिलीज डेट आज संध्याकाळी 4.05 वाजता घोषीत करण्यात आली. आता अनेकजण चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी आतुर असल्याचं दिसत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 17 नोव्हेंबर रोजी 6.03 रिलीज होणार आहे.

ट्रेलर कधी रिलीज होईल? : अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल स्टारर चित्रपट 'पुष्पा 2 द रुल' 5 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. मैत्री मुव्हीज मेकर्स प्रस्तुत, 'पुष्पा 2'ची निर्मिती सुकुमार यांनी केली आहे. या चित्रपटाला देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिलं आहे. याशिवाय साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रीलीला या चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसणार आहे. आता या गाण्याला पाहण्यासाठी देखील अनेकजण आतुर आहेत. 'पुष्पा 2' आधी 6 डिसेंबरला रिलीज होणार होता आणि आता एक दिवस आधी 5 डिसेंबरला रिलीज होणार आहे. याच दिवशी, म्हणजेच 6 डिसेंबर रोजी विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'छावा' हा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

'पुष्पा 2 द रुल' स्टार कास्ट : 'पुष्पा 2' एक दिवस आधी रिलीज झाल्यानं 'छावा'च्या बॉक्स ऑफिस कमाईवर मोठा परिणाम होणार आहे. 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटामध्ये फहद फासिल, रश्मिका मंदान्ना, प्रियामणी, अनुसया भारद्वाज, प्रकाश राज, राव रमेश, जगपती बाबू आणि इतर कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 400-500 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. दरम्यान बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2 द रुल' आणि 'छावा' या चित्रपटामध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

'पुष्पा 2'मध्ये श्रीलीलाची अधिकृत एंट्री, पोस्टर रिलीज करून निर्मात्यांनी दिला चाहत्यांना सुखद धक्का...

Viral photo : 'पुष्पा 2' च्या गाण्याच्या शूटिंगमधील अल्लू अर्जुन आणि श्रीलीलाचा फोटो लीक

'पुष्पा 2' च्या ट्रेलरचं काउंट डाऊन सुरू, दरम्यान अल्लू अर्जुन-फहद फासिलचे पोस्टर जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.