मुंबई: साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटिया, अविनाश तिवारी आणि जिमी शेरगिल स्टारर बहुप्रतीक्षित 'सिकंदर का मुकद्दर' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात हायप्रोफाईल हिऱ्यांच्या लुटमारीची रंजक कहाणी दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात जिमी शेरगिलनं एका पोलिसाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 29 नोव्हेंबर 2024 रोजी नेटफ्लिक्स या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. तमन्ना आणि अविनाश तिवारी हे कलाकार या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान 'सिकंदर का मुकद्दर'चा ट्रेलर हा 2 मिनिट, 28 सेकंदांचा आहे.
'सिकंदर का मुकद्दर'चा चित्रपटाचा ट्रेलर कसा आहे? : 'सिकंदर का मुकद्दर'च्या ट्रेलरची सुरुवात एका हाय-प्रोफाइल डायमंड चोरीपासून होते. यानंतर जसजसा पोलिसांचा तपास पुढं जातो, यात जिमी शेरगिला तीन जणांवर संशय येतो. यामध्ये पहिला मंगेश देसाई (राजीव मेहता), कामिनी सिंग (तमन्ना भाटिया) आणि सिकंदर शर्मा (अविनाश तिवारी) हे लोक असतात. सिकंदर हा आरोप फेटाळतो आणि कामिनीबरोबर पळून जाण्याची योजना आखतो. मात्र तरीही त्याला त्याचा भूतकाळ नेहमीच आठवत असतो. या घटनेमुळे त्याला खूप त्रास होत असते. इन्स्पेक्टर जसविंदर सिंग (जिमी शेरगिल) त्याला शेवटपर्यंत सतावत राहतो. यानंतर सिकंदर जसविंदरचा सामना करतो. त्याला मुंबईबाहेर राहण्यास भाग पाडणे आणि 15 वर्षांपासून त्याच्या आयुष्याला उलथापालथ केल्याचा दोष तो जसविंदरला देतो. या चित्रपटाचा ट्रेलर हा जसविंदरच्या संवादानं संपतो. यात तो म्हणतो, "तुझ्या बायोपिकचे शीर्षक 'सिकंदर का मुकद्दर' आहे आणि मी त्याचा दिग्दर्शक आहे."
'सिकंदर का मुकद्दर'ची निर्मिती : 'सिकंदर का मुकद्दर' हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे, शीतल भाटिया निर्मित हा चित्रपट फ्रायडे स्टोरीटेलर्स बॅनरखाली बनवला आहे. दरम्यानस तमन्ना भाटियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच 'स्त्री 2' मध्ये दिसली होती. अविनाश तिवारी हा 'लैला मजनू'मुळे लोकप्रिय झाला आणि शेवटी तो मडगाव एक्सप्रेसमध्ये दिसला होता. दरम्यान 'सिकंदर का मुकद्दर'मध्ये जसविंदर सिंगला चोराला पकडण्यात यश येणार का ? तसेच हा चोर आपला गुन्हा कबूल करेल का ? हे हा चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.