सोलापूर- गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत गावठी दारूचा साठा जप्त केला आहे. यामध्ये 37 हजार रुपयांची हातभट्टी दारू व 75 हजार रुपयांची एक रिक्षा, असा एकूण 1 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका संशयित आरोपीस अटक करण्यात आले आहे. राजू शंकर राठोड (वय 27 वर्षे, रा. मुळेगाव तांडा, ता.दक्षिण सोलापूर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या दहिटने शिवारात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. काळ्या रंगाच्या रबरी टुबामध्ये हातभट्टी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही हातभट्टी दारू वाहतूक करताना एकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 740 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. तसेच एक रिक्षा (क्र. एम एच 13 एन 3376) देखील जप्त केली आहे. यानंतर राजू राठोडला अटक करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ, राकेश पाटील, वसंत माने, सचिन बाबर, शितल शिवशरण, संतोष फुटाणे, विजय वाळके या पथकाने केली. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -विशेष : लॉकडाऊननंतर टोल प्लाझावर वाहनांच्या रांगा; फास्टॅगकडे वाहनधारकांची पाठ