ETV Bharat / state

भारत बंद आंदोलन; माजी आमदार आडम मास्तरांसह शेकडो कार्यकर्ते ताब्यात - bharat-bandh protest latest news

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सोलापुरात कोणतेही आंदोलन किंवा मोर्चा काढण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. आज शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता

भारत बंद आंदोलन
भारत बंद आंदोलन
author img

By

Published : Mar 26, 2021, 6:03 PM IST

Updated : Mar 26, 2021, 7:41 PM IST

सोलापूर- सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण, कृषी कायद्यांना विरोध आदी मागण्यासाठी आज (शुक्रवारी) संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण मोदी सरकार किंवा केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या माकप व सिटूच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालसमोर जमा होताच ताब्यात घेण्यात आले. यात माजी आमदार नरसय्या आडम मास्तर याचाही सामावेश आहे. आंदोलन करू न दिल्याने आंदोलकांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत ही हुकूमशाही चालणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण पोलिसांनी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी होऊ दिली नाही.

भारत बंद आंदोलन
पोलिसांनी परवानगी नाकारलीकोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सोलापुरात कोणतेही आंदोलन किंवा मोर्चा काढण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. आज शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयसमोर जमा होऊन निदर्शने करण्याचे आवाहन केले होते. पण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा होणाऱ्याना ताबडतोब अटक करण्यात आले.नरसय्या आडम मास्तर पोलिसांच्या ताब्यातपोलिसांनी माकपच्या कार्यालसमोर कडक बंदोबस्त लावला होता. माजी आमदार नरसय्या आडम यांनी पोलिसांच्या विरोधाला डावलून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आणि मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोदी सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात भाषण देऊ लागले. पण पोलिसांनी काही वेळातच माजी आमदार नरसय्या आडम सह शेकडो कार्यकर्त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले.

Last Updated : Mar 26, 2021, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.