सोलापूर- सोलापूर ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत 10 जणांना अटक केली असून, 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोलापूर अक्कलकोट महामार्गाजवळ असलेल्या गंगाप्रसाद पेट्रोल पंपामागे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकला.
यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून 10 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठग्गा उर्फ इस्माइल सलीम नदाफ असे या जुगार अड्डा चालकाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. शंकर अरविंद भोपळे (वय 44), श्रीकांत मल्लिनाथ करपे (वय 31), उमर महिबूब दारूदवाले (वय 33), रविकांत सिद्राम बगले (वय 30), लतीफ इमाम पानगल(वय 45), जयपाल अशप्पा जंगम (वय 41), सिताराम सायबना गुंजले (वय 30), शाहनवाज शहापूरे (वय 28), यलप्पा नारायण जाधव (वय 50) आणि चंद्रकांत बसवन्त फुलारी (वय 39) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा - सेक्युलर म्हणणारे सर्वात अधिक धर्मांध - संजय राऊत
हेही वाचा - प्रगतीशील शेतकऱ्याने परराज्यातील मजुरांसोबत साजरी केली दिवाळी