सोलापूर - कोरोनाचे फैलाव होऊ नये, यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे अनेक जण आपल्या घरापासून दूर अडकून पडलेले आहेत. अशाच प्रकारे सुमारे 450 तमिळ नागरिक पंढरपुरात अडकले होते. त्यांच्या जेवणाची सोय सोलापूर ग्रामीण पोलीस व इस्कॉन सदस्यांच्या वतीने करण्यात आली.
या तमिळ नागरिकांकडे खाण्याचे साहित्य नसल्याने त्यांचे हाल होत होते. ही बाब लक्षात येताच पोलीस व इस्कॉन त्यांच्या मदतीसाठी धावून येत त्यांच्या जेवणाची सोय केली. तसेच पंढरपूर बसस्थानक परिसरात असलेल्या बेघर नागरिकांना जेवण देण्यात आले. जेवणाचे वाटप करताना गर्दी होऊ यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या सुचना त्यांना देण्यात येत होत्या.
हेही वाचा -पालावरच्या भटक्या कुटुंबाची दोन दिवसापासून उपासमार, 'असा' पोहोचला मदतीचा 'हात'