सोलापूर - कोरोना व्हायरस संदर्भात बनावट ऑडिओ क्लिप बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जिल्ह्यातील तिसरा गुन्हा आहे.
कोरोना संदर्भात बनावट ऑडिओ क्लिप बनवून सोशल मीडियावर व्हायरल करुन समाजात भितीचे वातावरण पसरवले होते. त्यामुळे पवन जाधव, भैरू मोरे आणि वसंत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गणेश दळवी बार्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार या तिघांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.