सोलापूर - शहरातील एका कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. जाकीरहुसेन हिदायतरसूल शेख (वय - 45, रा. अशोक चौक) असे या मृताचे नाव आहे. जाकीरहुसेन हे सोलापूर शहर उत्तर वाहतूक शाखेत पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू होते.
जाकीरहुसेन ड्युटीवर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 7 जूनला त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता. यामुळे त्यांना अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रुग्णालयात दाखल झाल्यापासून जाकीर शेख यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, 24 जूनला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी 134 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर तिघांचा मृत्यू