ETV Bharat / state

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : Jul 3, 2020, 4:50 PM IST

भीमा नदी व माण नदीमधून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरोधात कारवाई केली आहे. तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी 6 ब्रास वाळूसह 24 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Police action against illegal sand mafia in solapur
अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर - भीमा नदी व माण नदीमधून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरोधात कारवाई केली आहे. तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी 6 ब्रास वाळूसह 24 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाच ट्रॅक्टर चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी भीमा नदीतून वाळू उपसा करण्यास बंदी घातली आहे. परंतु, शासनाने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत वाळूमाफिया राजरोसपणे अवैधरित्या वाळू उपसा करत आहेत. नदीकाठच्या अनेक गावांमधून वाळू उपसा केला जात आहे. लॉकडऊन असो किंवा संचाबंदी असो, या वाळू माफियांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे.

गुरुवारी दुपारी तालुका पोलिसांना माहिती मिळाली की, सरकोली येथे ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना ट्रॅक्टर वाळू घेऊन जात असल्याचे दिसले. यावेळी पोलिसांनी 5 ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दिगंबर तानाजी करळे, बाहुबली शरद भालेराव, नितीन पोपट भोसले, संदीप सुरेश हाबळे(सर्व रा. सरकोली), सुभाष रामचंद्र नवले (रा ओझेवाडी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी (एमएच 45 एफ 8263, एमएच 13 एजे 5236, एमएच 13 सीएस 5770, एमएच 13 एजे 0080, एमएच 13 एजे 736 ) 5 ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे. तसेच यामधून वाळूसह 24 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत बापूसाहेब मोरे यांनी गुरुवारी रात्री उशिरा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक किरण अवचर अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.