ETV Bharat / state

'सोलापुरात 2 लाख 73 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन; शेतकऱ्यांच्या बांधावर खत, बियाणांचे वाटप' - सोलापूर लागवडीखालील क्षेत्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अडचण येऊ नये यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन बियाणे व खताचा पुरवठा करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्र्य भरणे यांनी केल्या होत्या. त्यानंतर खरीपाचे नियोजन म्हणून 7 हजार 471 शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन खताचा आणि बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना आतापर्यंत बांधावर 22170 क्विंटल खताचे आणि 171 क्विंटल बियाणे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली.

solapur sowing hectares  solapur latest news  solapur farming news  solapur kharip  सोलापूर खरीपाचे नियोजन  सोलापूर लागवडीखालील क्षेत्र  सोलापूर लेटेस्ट न्युज
पालकमंत्री दत्तात्रय भरणे
author img

By

Published : May 25, 2020, 5:18 PM IST

सोलापूर - जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2 लाख 73 हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांच्या बांधावर 22 हजार क्विंटल खत आणि 171 क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले आहे. हे खत आणि बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना देण्यात आले आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

'सोलापुरात 2 लाख 73 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन; शेतकऱ्यांच्या बांधावर खत, बियाणांचे वाटप'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अडचण येऊ नये यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन बियाणे व खताचा पुरवठा करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्र्य भरणे यांनी केल्या होत्या. त्यानंतर खरीपाचे नियोजन म्हणून 7 हजार 471 शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन खताचा आणि बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना आतापर्यंत बांधावर 22170 क्विंटल खताचे आणि 171 क्विंटल बियाणे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली. शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे हे उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्ह्यातील 8 हजार 485 कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्व बियाण्यांची उपलब्धता करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीपासाठी 2 लाख 11 हजार 390 टन रासायनिक खतांचा पूरवठा करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यापैकी आतापर्यंत 43 हजार 59 टन रासायनिक खताचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच खासगी कंपन्या व महाबीजमार्फत 31 हजार 998 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होणार आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम -

जिल्ह्यात 2.73 लाख हेकटर खरीप पेरणी नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने बाजरी, मका, तूर, उडिद, सोयाबीन, मूग, सूर्यफुल पिकांचा समावेश आहे.

खासगी कंपन्या व महाबीजमार्फत 31998 क्विंटल‍ बियाण्यांचा पुरवठा होणार.

रासायनिक खते 2,11,390 मेट्रीक टनपैकी 43059 मेट्रीक टन पुरवठा झाला.

पीक कर्ज वाटप 1438.41 कोटीचे उद्दिष्ट आहे, आतापर्यंत 116.10 कोटी रुपये वाटप

राज्यातील खरीपाची परिस्थिती -
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. आतापर्यंत १८ हजार शेतकरी गटांच्या माध्यमातून ६० हजार मेट्रिक टन खते, २० हजार क्विंटल बियाणे दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. राज्यात सोयाबीन बियाण्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाण्यासह इतर कोणतेही बियाणे आणि खते कमी पडू दिले जाणार नाहीत, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. राज्यात सोयाबिन उबवन क्षमतेचे ६३ हजार प्रयोग झाले असून शेतकऱ्यांना घरातील सोयाबीन बियाणे वापरण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात युरियाचा ५० हजार मेट्रिक टन अतिरिक्त साठा करून ठेवण्यात आला आहे. या हंगामात २५ हजार शेतीशाळा घेण्याचे नियोजन केले असून त्यात २५ टक्के शेतीशाळा महिलांच्या असतील. सिक्कीमच्या धर्तीवर राज्यात सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरणास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात प्रयोगशील शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली असून शेतकरी शास्त्रज्ञ मंच देखील स्थापन करण्यात आले आहेत.

राज्यातील कृषि क्षेत्र -

  • भौगोलिक क्षेत्र : ३०७ लाख हेक्टर
  • लागवडीलायक क्षेत्र :१७४ लाख हेक्टर
  • लागवडीखालील क्षेत्र
  • खरीप : १४९.७ लाख हेक्टर;
  • रब्बी : ५७ लाख हेक्टर
  • कोरडवाहू क्षेत्र - ८१ टक्के
  • एकूण शेतकरी संख्या – १.५२ कोटी;
  • लहान : २८.४० टक्के,
  • सीमांत : ५१.१० टक्के
  • सरासरी पर्जन्यमान : ११९८ मीमि.
  • प्रमुख पिके :
  • खरीप : भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर , कापूस, सोयाबीन, ऊस
  • रब्बी : ज्वारी, गहू, हरभरा

खरीप हंगाम २०२० नियोजन -

  • विविध पिकाखालील एकूण क्षेत्र : १४०.११ लाख हेक्टर
  • सोयाबीन व कापसाचे क्षेत्र ८२ लाख हेक्टर
  • बियाणे बदलानुसार एकूण बियाणे गरज: १६.१५ लाख क्विंटल
  • खरीप हंगाम २०२० साठी अंदाजित बियाणे उपलब्धता : १७.५१ लाख क्विंटल (महाबीज- ५.०८, राबिनि-०.३१ व खासगी-११.८६ लाख क्विंटल.)
  • खरीप हंगाम २०२० (एप्रिल ते सप्टेंबर)साठी एकूण ४० लाख मेट्रीक टन खते मंजूर, खरीप २०१९ मध्ये ३३.२७ लाख मेट्रीक टन खतांचा वापर.
  • १७ मे २०२० पर्यंत खतांची उपलब्धता : २६.१३ लाख मेट्रीक टन, पैकी ७.१५ लाख मेट्रीक टन खतांची विक्री
  • खरीप २०२० मध्ये सोयाबीनचे अपेक्षित क्षेत्र : ४० लाख हेक्टर आहे. एकूण बियाणे गरज: १०.५० लाख क्विंटल.
  • संभाव्य सोयाबीन बियाणे उपलब्धता: महाबीज ३.९१ लाख क्विंटल + राबिनि ०.२२ लाख क्विंटल + खासगी ७.११ लाख क्विंटल = एकूण ११.२४ लाख क्विंटल

राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित असून ९८ टक्के क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड केली जाते. या क्षेत्रासाठी १ कोटी ७० लाख बियाणे पाकिटांचे आवश्यकता आहे. कापूस कंपन्यांनी २ कोटी ७२ लाख पाकिटांचे पुरवठा नियोजन केलेले आहे. त्यामुळे राज्यात कापूस बियाणे पाकीट यांचा तुटवडा भासणार नाही.

खत पुरवठा नियोजन -

राज्यात एकूण ४० लाख मेट्रीक टन खताचे नियोजन आहे.

  • खत विक्रेते- ४४ हजार १४५
  • बियाणे विक्रेते- ३८ हजार ४७९
  • किटकनाशके विक्रेते- ३५ हजार ८४१

गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने भरारी पथकांची स्थापना -

प्रत्येक जिल्हास्तरावर एक याप्रमाणे एकूण ३५ पथके, प्रत्येक उपविभागस्तरावर ९०, तालुकास्तरावर ३५१, राज्यस्तरावर मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक स्थापन करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे पोहोचविण्यासाठी १७ हजार ११४ शेतकरी गट कार्यरत आहेत.

  • ठाणे विभाग - ५६७
  • कोल्हापूर विभाग- १७६६
  • नाशिक विभाग- १२०१
  • पुणे विभाग- ४४५२
  • औरंगाबाद विभाग- ९८९
  • लातूर विभाग- १६६८
  • अमरावती विभाग- १९४८
  • नागपूर विभाग- ४५२३

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.