ETV Bharat / state

विठुरायाचे मुखदर्शन घेऊ.. मात्र, विठु माऊलीच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर नको - पंढरपूर विठ्ठल रुखमाई

एखाद्या कोरोनाग्रस्त भाविकाने पायावर दर्शन घेतल्यास त्यानंतर येणाऱ्या भाविकाला कोरोनाची लागण होण्याची भीती राहू शकते. हे टाळण्यासाठी देवाच्या पायावर सॅनिटायझर फवारावे लागेल आणि यालाच वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला आहे.

pandharpur vithhal temple reopening news amid corona
विठु माऊली
author img

By

Published : Aug 28, 2020, 12:38 PM IST

पंढरपुर (सोलापूर) - राज्यातील धार्मिक स्थळ उघडण्याबाबत सर्वच धर्मीय मागी करत आहेत. अशातच राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडल्यानंतर विठुरायाच्या पायावरील दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल, मात्र विठु माऊलीच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकू नका, अशी मागणी वारकरी फडतारी दिंडी सांप्रदायाने केली आहे.

विश्व वारकरी सेना व वंचितच्या मदतीने एक लाख वारकरी घेऊन विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. सर्वच पक्षातील राजकीय नेते मंदिर उघडण्याबाबत आता आक्रमक होऊ लागले आहे. याबाबत राज्य सरकारने 30 ऑगस्टपर्यंत निर्णय घेणे अपेक्षित आहे.

इतर मंदिराच्या तुलनेने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पायावर दर्शन असल्याने वेगळा प्रश्न उभा राहणार आहे. एखाद्या कोरोनाग्रस्त भाविकाने पायावर दर्शन घेतल्यास त्यानंतर येणाऱ्या भाविकाला कोरोनाची लागण होण्याची भीती राहू शकते. हे टाळण्यासाठी देवाच्या पायावर सॅनिटायझर फवारावे लागेल आणि यालाच वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला आहे. कोरोनाची लस येईपर्यंत देवाचे मुखदर्शन घेऊ, पण पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर मारु नये, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. ज्या पंढरपूरचे महत्त्व देवाच्या पायावरील दर्शनाने आहे, ते बाजूला ठेवण्यास वारकरी संप्रदाय तयार झाला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी भजन-कीर्तनास परवानगी मिळावी, अशी मागणीदेखील वारकरी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.