पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी पांडूरंगाची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मंदिर समितीतील पुजारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. आदेश देण्यात आल्यानंतर विठ्ठल मंदिर समितीतील 45 पुजारी व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. ज्या पुजारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. त्यांनाच आषाढी एकादशीला मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती, समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांची लसीकरण मोहीम
येत्या 20 जुलै रोजी पंढरपुरात आषाढी एकादशी सोहळा पार पडणार आहे. विठ्ठलाच्या महापूजेच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपुरात येणार आहेत. राज्य सरकारकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमधील पुजारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे आदेश मंदिर प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून मंदिर समितीकडून पुजारी व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तसेच आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देखील मंदिर प्रशासनाला देण्यात आले आहेत.
हेही वाचा - 'शिक्षकांना जुंपले 'बीएलओ'च्या कामाला, दहावीच्या निकालाचं काय?'