ETV Bharat / state

सहा जिल्ह्यांचा प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापुरात दाखल - 26 MT Oxygen Solapur

प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासन हे आपल्या पातळीवर जिल्ह्यातील रुग्णांसाठी ऑक्सिजन प्राप्त करण्यासाठी कसरत करताना दिसत आहे. अशात आज ओरिसा येथून 93.38 मेट्रिक टन प्राण वायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापुरात आली. यामधून सोलापूर जिल्ह्यासाठी 26 मेट्रिक टन प्राणवायू घेण्यात आले आणि बाकीचे ऑक्सिजन इतर जिल्ह्यांना वाटप करण्यात आले.

Oxygen Express arrives at Solapur
ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापूर बातमी
author img

By

Published : May 20, 2021, 8:36 PM IST

सोलापूर - कोरोना महामारीने महाराष्ट्र राज्यात थैमान घातले आहे. फुफ्फुसांवर परिणाम झाल्याने प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन द्यावे लागत आहे. मार्च ते एप्रिल दरम्यान महाराष्ट्र राज्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने ऑक्सिजनचा देखील तुटवडा निर्माण झाला. प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासन हे आपल्या पातळीवर जिल्ह्यातील रुग्णांसाठी ऑक्सिजन प्राप्त करण्यासाठी कसरत करताना दिसत आहे. अशात आज ओरिसा येथून 93.38 मेट्रिक टन प्राण वायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापुरात आली. यामधून सोलापूर जिल्ह्यासाठी 26 मेट्रिक टन प्राणवायू घेण्यात आले आणि बाकीचे ऑक्सिजन इतर जिल्ह्यांना वाटप करण्यात आले.

माहिती देताना ऑक्सिजन कमिटीचे अध्यक्ष हेमंत निकम

हेही वाचा - बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करत प्रहार संघटनेने जपली माणुसकी

अंगुल (ओरिसा) येथून 36 तासांत ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

ओरिसा राज्यामधील अंगुल जिल्ह्यातून ऑक्सिजन एक्सप्रेस 18 मे रोजी सोलापूरकडे निघाली होती. यासाठी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाने ऑक्सिजन एक्सप्रेस विना अडथळा रवाना करण्यासाठी अंगुल (ओरिसा) ते सोलापूर (महाराष्ट्र) असे ग्रीन कॉरिडॉर निर्माण केले होते. तब्बल 36 तासांच्या प्रवासानंतर आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील बाळे रेल्वे स्थानकावर ही एक्सप्रेस दाखल झाली. एक्सप्रेस येण्याअगोदर सहाही जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी सोलापुरात आले होते.

सहा जिल्ह्यांना 93 मेट्रिक टन प्राणवायू वाटप

सद्यस्थितीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला प्राणवायूची आवश्यकता आहे. आजही अनेक जिल्ह्यांतील हॉस्पिटलमध्ये प्राणवायूचा तुटवडा आहे. ओरिसा येथून आलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसमधून सोलापूर जिल्ह्याला 26 मेट्रिक टन, लातूर जिल्ह्याला 11 मेट्रिक टन, उस्मानाबादला 12 मेट्रिक टन, औरंगाबादला 15 मेट्रिक टन, नांदेड 12 मेट्रिक टन, जालना 17 मेट्रिक टन, असे ऑक्सिजनचे वाटप करून टँकर रवाना करण्यात आले.

बाळे रेल्वे स्थानकावर वरीष्ठ अधिकाऱ्यांची ऑक्सिजनसाठी धावपळ

सोलापूर स्थानकाच्या जवळच अतिशय छोटेसे बाळे रेल्वे स्थानक आहे. क्वचितच या ठिकाणी नागरिक किंवा अधिकारी येत असतात. पण, आज या रेल्वे स्थानकावर सहा जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी, सोलापूर जिल्ह्यातील रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी आणि आरटीओचे देखील वरिष्ठ अधिकारी आले होते. ऑक्सिजन एक्सप्रेस येण्याअगोदर सहा जिल्ह्यांचे वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील रुग्णांचे प्राण वाचवणे, त्यांना वेळेवर आणि मुबलक प्राणवायू मिळावा यासाठी सहाही जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑक्सिजन घेण्यासाठी धावपळ झाली.

हेही वाचा - खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; भाजपाची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.