ETV Bharat / state

जे आजोबा करू शकले नाहीत, ते नातू काय करणार; असदुद्दिन ओवैसींचा शेकापला टोला - सदुद्दीन ओवैसी

सांगोला तालुक्यात एमआयएम पक्षाचे उमेदवार अॅड.शंकर सरगर यांच्या निवडणूक प्रचारसभेसाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आले होते. यावेळी, 'जे आजोबा करू शकले नाहीत; ते नातू काय करणार', असा थेट प्रश्न त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला केला आहे.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी
author img

By

Published : Oct 9, 2019, 12:43 PM IST

सोलापूर - सांगोला तालुक्यात एमआयएम पक्षाचे उमेदवार अॅड.शंकर सरगर यांच्या निवडणूक प्रचारसभेसाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आले होते. यावेळी, 'जे आजोबा करू शकले नाहीत; ते नातू काय करणार', असा थेट प्रश्न त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला केला आहे.

सांगोल्याचे राजकारण हे 55 वर्षांपासून शेतीचे पाणी व पिण्याचे पाणी या प्रश्ना भोवती फिरत आहे. त्यामुळे शेतीचा व पाण्याचा प्रश्न जे आजोबा सोडू शकले नाहीत, तो प्रश्न नातू काय सोडवणार, अशा थेट प्रश्न ओवैसी यांनी केला. यावेळी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या घराणेशाहीला उद्देशून टोला लगावला.

हेही वाचा बीडमध्ये शेख शफीक औरंगाबादची पुनरावृत्ती करणार - ओवैसी

एमआयएम पक्ष हा जातीवादी किंवा देशद्रोही पक्ष नसून, खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शंकर सरगर यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी स्थानिकांनी केले. हिंदुस्थानातील मुस्लिमांना पाकिस्तानचे काही देणे घेणे नाही. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप सरकार आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशा पद्धतीचा विखारी प्रचार करत असल्यताची टीका ओवैसी यांनी केली. तसेच देशात राहणारा प्रत्येक मुस्लीम बांधव हा देशप्रेमी असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा सर्व जातीतील वंचितांना आम्ही संधी दिली - ओवैसी

शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवून डाळिंब निर्यातीवरील बंदी उठल्यास सांगोल्याचे डाळिंब आम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांना खायला घालू असे ते म्हणाले. आजोबांनंतर नातवापर्यंत चालू असलेली घराणेशाही मोडून एमआयएमचे उमेदवार शंकर सरगर यांना निवडून देण्याचे आवाहन खासदार ओवैसी यांनी केले.

या प्रचारसभेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:सांगोला येथे एम आय एम पक्षाचे उमेदवार अॅड शंकर सरगर यांच्या विधानसभेच्या प्रचार सभेसाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे सांगोला मध्ये आले होते .Body:जे आजोबा करू शकले नाहीत ते नातू काय करणार? एमआयएमचे खासदार असद्दिन ओवैसी यांची शेतकरी कामगार पक्षावर टीका .

सांगोला येथे एम आय एम पक्षाचे उमेदवार अॅड शंकर सरगर यांच्या विधानसभेच्या प्रचार सभेसाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे सांगोला मध्ये आले होते .ते म्हणाले की सांगोल्याचे राजकारण हे 55 वर्षापासून शेतीचे पाणी व पिण्याचे पाणी या प्रश्नाभोवती फिरत आले आहे. त्यामुळे शेतीचा व पाण्याचा प्रश्न जे आजोबा सोडू शकले नाहीत तो प्रश्न नातू काय सोडवणार अशा पद्धतीचा सवाल ओवैसी यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या घराणेशाहीला उद्देशून अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे .एम आय एम पक्ष हा जातीवादी किंवा देशद्रोही पक्ष नसून खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एडवोकेट शंकर सरगर यांना विजय करण्याचे आव्हान त्यांनी सांगोलकर यांना केले .ते पुढे म्हणाले की हिंदुस्थानातील मुस्लिमांना पाकिस्तानचे काही देणे घेणे नाही केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना भाजप सरकार आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशा पद्धतीचा विखारी प्रचार करत आहेत .परंतु या देशात राहणारा प्रत्येक मुस्लिम बांधव हा देश प्रेमी आहे अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली. शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवून डाळिंब निर्यातीवरील बंदी उठल्यास सांगोल्याचे डाळिंब आम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना खाऊ घालू असे म्हणाले. आजोबां नंतर नातवा पर्यंत चालू असलेली घराणेशाही मोडून एमआयएमचे उमेदवार एडवोकेट शंकर सरगर यांना निवडून देण्याचे आवाहन खासदार ओवैसी यांनी केले. त्याच बरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस एम आय एम ला भाजपची बी टी म्हणत होते त्यामुळे काँग्रेसची अवस्था आता सि टीम पेक्षा भयंकर झाल्याची टीका खासदार ओवैसी यांनी केली. या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.